-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५० वा शौर्य दिन आज १६ फेब्रुवारी २०२० ला आहे आणि उद्या १७ फेब्रुवारीला पुण्यतिथी सोहळा आहे. त्यानिमित्त आजपासून उमरठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या संयुक्त समाधीच्या नूतनीकरणाच्या वास्तूचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत स्व. प्रभाकर पाटील यांनी १९८० सालापासून नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सुरु केली, त्याची ही सत्यकथा ३५० व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने...
श्रीरामचंद्रांकडे ज्याप्रमाणे मारुतीराया होते, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांकडे नरवीर तानाजी मालुसरे होते. दोघांनीही भक्ती, शक्ती आणि सेवेचा जगाला आदर्श घालून दिला. दोघेही निरपेक्ष होते. एक चिरंजीव आहे, तर दुसरा वीरगती पत्करुन अमर झाला. परंतु रायगडच्या जनतेला आपल्या उमरठने स्वराज्याला एक नररत्न दिले याचे विस्मरण झाले आणि उमरठ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची काहीशी उपेक्षाच केली. परंतु स्व. प्रभाकर पाटील यांनी आपल्या जि.प. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ही उपेक्षेची धूळ झटकून १९८० सालापासून उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सुरु केली आणि त्यासाठी नरवीरांचे ११ वे वंशज बाळकृष्ण नारायणराव मालुसरे (दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले) यांना आमंत्रित केले. नारायणराव बळवंतराव मालुसरे हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे १० वे वंशज. त्यांना तानाजी मालुसरे (थोरले घराणे) आणि बाळकृष्ण मालुसरे (धाकटे घराणे) हे दोन पुत्र. थोरल्या तानाजी नारायणराव मालुसरे यांची दोनही मुले नारायण तानाजी मालुसरे (वय ६४ वर्षे) आणि अप्पाजी तानाजी मालुसरे (वय ५५ वर्षे) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील झेंडेवाडी येथे आहेत. या दोन १२ व्या वंशजांपैकी नारायण तानाजी मालुसरे यांचे पुत्र रामचंद्र मालुसरे (वय ३० वर्षे), तर अप्पाजी तानाजी मालुसरे यांचे पुत्र ओमकार मालुसरे (वय २४) हेे १३ वे वंशज पुणे येथे वास्तव्यास आहेत. अनगोळ-बेळगाव येथे वास्तव्यास असलेले धाकट्या घराण्याचे (कै) बाळकृष्ण नारायणराव मालुसरे यांंचे २०१२ साली अपघाती निधन झालेले पुत्र शिवराज बाळकृष्ण मालुसरे हेही नरवीर तानाजी यांचे १२ वे वंशज. त्यांच्या पेशाने शिक्षिका असलेल्या पत्नी डॉ. शीतल शिवराज मालुसरे आपले पुत्र रायबा, कन्या अंकिता, देवयांनी या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या १३ व्या वंशजांसह महाड येथे वास्तव्यास आहेत.
तानाजी मालुसरे यांचे वंशज
वास्तविक नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज आहेत की नाहीत याची कल्पना कुणालाच नव्हती. त्याचे असे झाले १६७६ साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीवर निघाले. कोल्हापूर नजीकच्या पारगाव गावी मौनी बाबांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले. चिमुटभर साखर महाराजांच्या हातावर घातली व मोरपीसाने महाराजांच्या डोक्यावर आशीर्वाद दिला. ‘विजयी भव’ या आशीर्वादावर महाराज कर्नाटक प्रांत पार करुन मद्रास प्रांतापर्यंत गेले. पारगावहून जाताना महाराज पारगडमार्गे गेले. पारगडची भौगोलिक रचना पाहून या ठिकाणी शिबंदी ठेवली तर पोर्तुगीज, विजापूरकर, खेम सावंत यांच्यावर कायमची जरब राहील याची त्यांना खात्री वाटली व शिबंदीला पाचशे मावळ्यांची नेमणूक पारगडवर केली. आपले जीवाभावाचे मित्र नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे यांना त्या ठिकाणी किल्लेदार म्हणून नेमले व चंद्रसूर्य असेपर्यंत या गडाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना ताम्रपट (सनद) दिला. तेव्हापासून रायबा तानाजी यांचे वंशज बाळकृष्ण नारायण मालुसरे (दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.) आणि इतर मावळ्याचे वंशज या पारगडावर अजूनही वास्तव्यास आहेत. १९७९ साली पारगडावर बाळकृष्ण मालुसरे यांनी आपल्या सहकार्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. या पुतळ्याच्या निमित्ताने पारगडपर्यंत बुलडोझरने कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पुतळ्याच्या अनावरणासाठी दहा हजार लोकांनी तेथे उपस्थिती लावली. ही संधी साधून बाळकृष्ण मालुसरे यांनी पारगडचा इतिहास सांगितला आणि आपण नरवीरांचे ११ वे वंशज आहोत हे जाहीर केले. पुढे बेळगावचे लोकसत्तेचे वार्ताहर एस.एन. पवार यांनी मुंबईच्या रविवार लोकसत्तेत नरवीर तानाजी मालुसरेंचे वंशज बेळगावातील पारगडमध्ये आहेत अशा आशयाचा लेख लिहिला. या लेखामुळे महाराष्ट्रातून बाळकृष्ण मालुसरे यांच्यावर पत्रांचा पाऊस पडला. या सर्व पत्रांमध्ये एकच प्रश्न होता. तुम्ही नरवीरांचे वंशज कसे? तुमच्याकडे त्याबाबत काय पुरावा आहे? सर्वांना थोडक्यात उत्तरे आणि सनदेच्या प्रती देऊन त्यांचे समाधान केले. परंतु पोलादपूर तालुक्यातील गावडी गावचे सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी मात्र बाळकृष्ण मालुसरे यांची दोन महिने पाठ सोडली नाही. अनेक पत्रोत्तरे देऊन बाळकृष्ण मालुसरे यांनी त्यांना सर्व पुराव्यांसह माहिती कळवली तेव्हा त्यांनी गावडी गावात २५ मालुसरेंची घरे आहेत आणि आम्ही सूर्याजी मालुसरेचे वंशज असून साखर गावात त्यांची समाधी असल्याचे कळविले. बाळकृष्ण मालुसरे यांनीही आपल्या पत्रात सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांना लिहिले की, मालुसरे वंश हा एक मोठा वटवृक्ष आहे. आपण त्या वृक्षाचे मोठा बुंधा असाल, मोठी ङ्गांदी असाल, पण मी त्या झाडाची हातभर का होईना पण डहाळी आहे.
पत्रोत्तरांची जुगलबंदी
अशाप्रकारे बाळकृष्ण मालुसरे आणि सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांची पत्रोत्तरांची जुगलबंदी रंगली असतानाच प्रभाकर पाटील यांच्या कानावर हा प्रकार गेला. त्यांनी स्वत: याप्रकरणी लक्ष घातले आणि सुभेदार लक्ष्मण मालुसरेंना सभापती उतेकर यांच्यासह बेळगावी पारगडावर जाण्याचा सल्ला दिला. पारगडावर होणार्या शिवजयंतीचे निमित्त साधून दोघे बेळगावला गेले. बाळकृष्ण मालुसरे या त्यांना घेऊन पारगडावर गेले. शिवजयंतीच्या समारंभात त्यांचा आ. नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंतर बाळकृष्ण मालुसरे त्यांना घेऊन आपल्या निवासस्थानी आले. त्यांनी वंशपरंपरेने चालत आलेल्या तानाजी मालुसरे यांच्या सर्व वस्तू दाखवल्या. त्यानंतर त्यांनी देवघरात जाऊन देवांना हार घातला. तेथे तानाजी मालुसरे यांची कवड्यांची माळ आणि तलवार वगैरे पाहून सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे गहिवरले. त्यांनी बाळकृष्ण मालुसरे यांना मिठी मारली आणि त्यांना रडूच फुटले. त्यांनी म्हटले, इतक्या पिढ्यानंतर तानाजी, रायबांचे वंशज आम्हाला भेटले. हा आयुष्यातील मोठा योगायोग आहे. आमच्या मागील पिढीत रायबाने आत्महत्या केली, संन्यास घेतला अशा अनेक वावड्या उठल्या. परंतु रायबाचे वंशज पारगडावर आहेत हे समजल्यावर गेले दोन महिने मला झोपेचे, भूकेचे भान नव्हते. प्रभाकर पाटील यांच्या सल्ल्यानेच आज मी सभापती उतेकर यांना पारगडावर घेऊन आलो, त्यामुळे आपली भेट झाली. अन्यथा रायबा हा विषयच आमच्या दृष्टीने बंद होता.
पोलादपूरला सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे आणि उतेकर आल्यानंतर उतेकर यांनी अलिबागला येऊन सर्व हकिगत प्रभाकर पाटील यांच्या कानावर घातली.
पुण्यतिथीस सुरुवात
त्याचवेळी प्रभाकर पाटील यांनी निर्णय घेतला की, यावर्षीपासून उमरठला नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी करायची व त्या पहिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण मालुसरे यांनाच आमंत्रित करायचे. अशा प्रकारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीस १९८० पासून सुरुवात झाली. बाळकृष्ण मालुसरे त्यांची मातोश्री सावित्रीबाई मालुसरे, बंधू, पारगडचे शेलार, झेंडे असे सर्व मानकरी घेऊन बेळगावहून मॅटेडोर गाडीने पोलादपूरला आले. त्यांच्या स्वागताला सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे हजर होते. पोलादपूरला विश्रामगृहात सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्या दिवशी दोन-तीन गाड्या घेऊन सर्वजण उमरठला गेले. रस्ता कच्चाच होता, पण दुपारी त्यांनी उमरठ गाठले. कळंबे यांच्या घरात सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी त्यांची सर्व व्यवस्था केली होती. नरवीर तानाजी मालुसरे यांना उमा नावाची मुलगी होती, ती उमरठच्या कळंबेंच्या घरात दिली होती. त्यामुळे कळंबे घराण्याने बाळकृष्ण मालुसरे यांच्या कुटुंबियांचे आणि पारगडच्या मानकर्यांचे जंगी स्वागत केले. दुपारी जिल्हा परिषदेच्या आठ-दहा गाड्या आल्या. शाळेच्या मुला-मुलींच्या चार-पाच बसेस आल्या. कार्यक्रमाला बरीच गर्दी होती. सभापती उतेकर यांनी बाळकृष्ण मालुसरे यांची प्रभाकर पाटील, आ. दत्ता पाटील, महाडचे आमदार व इतर जि.प. सदस्यांशी ओळख करुन दिली.
नरवीरांचा पोवाडा
कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण मालुसरे यांच्या मातोश्री सावित्रीबाई मालुसरे यांनी आपल्या खड्या आवाजात नरवीरांचा पोवाडा म्हणून केली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजाच्या सहवासात आपण आहोत या कल्पनेनेच प्रभाकर पाटील भारावून गेले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘हा एक मोठा योगायोग सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी घडवून आणला आहे. यापुढे पारगडाचे मालुसरे यांनी पंढरपूरच्या एकादशी वारीप्रमाणे दरवर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उमरठला यावे.’
यानंतर आ. दत्ता पाटील व बाळकृष्ण मालुसरे यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाचे उमरठच्या विकासाची मुहुर्तमेढ रोवली गेली. पुढे दोन वर्षात प्रभाकर पाटील यांनी उमरठचा कायापालट केला. नरवीरांच्या समाधीवर मेघडंबरी, पुतळ्याजवळ कमानी गेट, उमरठपर्यंत डांबरी रस्ता, नळपाणी योजना व विश्रामगृह व नरवीर तानाजी मालुसरे हॉस्पिटल अशी कामाची सुरुवात केली.
बाळकृष्ण मालुसरे आज हयात नाहीत. त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे आपण ११ वंशज आहोत म्हणून अभिमान बाळगला, परंतु गर्व बाळगला नाही. ते अनगोळ-बेळगाव येथे किराणा मालाचे दुकान चालवायचे आणि सर्वसामान्यांसारखे राहायचे. इतर संस्थानिकांप्रमाणे छत्रपतींचा झेंडा बाजूला ठेवून स्वत:चा झेंडा ङ्गडकवत ते स्वत:च्या मिशीला पीळ देत बसले नाहीत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, हीच श्रद्धा बाळकृष्ण मालुसरे यांच्याकडे होती. हा प्रांजळपणा प्रभाकर पाटील यांना आवडला आणि त्यांनी अखेरपर्यंत नरवीरांच्या ११ व्या वंशजाला अंतर पडू दिले नाही. आज पारगड, झेंडेवाडीला १२ वे आणि पुण्याला १३ वे वंशज आहेत, तर महाडलाही १३ वे वंशज आहेत. या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना आता रायगडच्या जनतेनेही अंतर पडू देऊ नये, इतकेच.

![]() |
| नरवीरांचे १३ वे वंशज रायबा, अंकिता, देवयानी मालुसरे, त्यांच्या मातोश्री डाॅ. शीतल मालुसरे. |

| शिवरायांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वीरदेहावर घातलेली कवड्यांची माळ |
पुण्यतिथीस सुरुवात
त्याचवेळी प्रभाकर पाटील यांनी निर्णय घेतला की, यावर्षीपासून उमरठला नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी करायची व त्या पहिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण मालुसरे यांनाच आमंत्रित करायचे. अशा प्रकारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीस १९८० पासून सुरुवात झाली. बाळकृष्ण मालुसरे त्यांची मातोश्री सावित्रीबाई मालुसरे, बंधू, पारगडचे शेलार, झेंडे असे सर्व मानकरी घेऊन बेळगावहून मॅटेडोर गाडीने पोलादपूरला आले. त्यांच्या स्वागताला सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे हजर होते. पोलादपूरला विश्रामगृहात सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्या दिवशी दोन-तीन गाड्या घेऊन सर्वजण उमरठला गेले. रस्ता कच्चाच होता, पण दुपारी त्यांनी उमरठ गाठले. कळंबे यांच्या घरात सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी त्यांची सर्व व्यवस्था केली होती. नरवीर तानाजी मालुसरे यांना उमा नावाची मुलगी होती, ती उमरठच्या कळंबेंच्या घरात दिली होती. त्यामुळे कळंबे घराण्याने बाळकृष्ण मालुसरे यांच्या कुटुंबियांचे आणि पारगडच्या मानकर्यांचे जंगी स्वागत केले. दुपारी जिल्हा परिषदेच्या आठ-दहा गाड्या आल्या. शाळेच्या मुला-मुलींच्या चार-पाच बसेस आल्या. कार्यक्रमाला बरीच गर्दी होती. सभापती उतेकर यांनी बाळकृष्ण मालुसरे यांची प्रभाकर पाटील, आ. दत्ता पाटील, महाडचे आमदार व इतर जि.प. सदस्यांशी ओळख करुन दिली.
![]() |
| नरवीर तानाजी मालुसरे यांची तलवार |
नरवीरांचा पोवाडा
कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण मालुसरे यांच्या मातोश्री सावित्रीबाई मालुसरे यांनी आपल्या खड्या आवाजात नरवीरांचा पोवाडा म्हणून केली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजाच्या सहवासात आपण आहोत या कल्पनेनेच प्रभाकर पाटील भारावून गेले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘हा एक मोठा योगायोग सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी घडवून आणला आहे. यापुढे पारगडाचे मालुसरे यांनी पंढरपूरच्या एकादशी वारीप्रमाणे दरवर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उमरठला यावे.’
यानंतर आ. दत्ता पाटील व बाळकृष्ण मालुसरे यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाचे उमरठच्या विकासाची मुहुर्तमेढ रोवली गेली. पुढे दोन वर्षात प्रभाकर पाटील यांनी उमरठचा कायापालट केला. नरवीरांच्या समाधीवर मेघडंबरी, पुतळ्याजवळ कमानी गेट, उमरठपर्यंत डांबरी रस्ता, नळपाणी योजना व विश्रामगृह व नरवीर तानाजी मालुसरे हॉस्पिटल अशी कामाची सुरुवात केली.
बाळकृष्ण मालुसरे आज हयात नाहीत. त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे आपण ११ वंशज आहोत म्हणून अभिमान बाळगला, परंतु गर्व बाळगला नाही. ते अनगोळ-बेळगाव येथे किराणा मालाचे दुकान चालवायचे आणि सर्वसामान्यांसारखे राहायचे. इतर संस्थानिकांप्रमाणे छत्रपतींचा झेंडा बाजूला ठेवून स्वत:चा झेंडा ङ्गडकवत ते स्वत:च्या मिशीला पीळ देत बसले नाहीत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, हीच श्रद्धा बाळकृष्ण मालुसरे यांच्याकडे होती. हा प्रांजळपणा प्रभाकर पाटील यांना आवडला आणि त्यांनी अखेरपर्यंत नरवीरांच्या ११ व्या वंशजाला अंतर पडू दिले नाही. आज पारगड, झेंडेवाडीला १२ वे आणि पुण्याला १३ वे वंशज आहेत, तर महाडलाही १३ वे वंशज आहेत. या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना आता रायगडच्या जनतेनेही अंतर पडू देऊ नये, इतकेच.

उमरठच्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतीथीची छान माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवा