मायबाप राजे आमुचे शिवबा गेले
आसवांनी गडकिल्ले झाले ओले
चैत्र पौर्णिमा श्रीहनुमान जयंती
मालवली रयतेची ह्रदय ज्योती
वाऱ्यांतून शब्द झंकारती राजे राजे
शिवपराक्रमाचा तेथे डिंडिम वाजे
गंगासागराची रायगडावर अमृत प्रिती
नाही तेथे कळीकाळाची हो भिती
शिवसमाधी, स्वराज्य, सप्तसिंधु तेथे
जीवन तरण्या टेकविता तेथे माथे
दु:खा येते अनिवार उधाण... भरती
परि चिरंजीव जगती शिवबांची स्मृती
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
तुम्ही कट करा रे भांडवलदारांनो
आमच्या उपाशी पोटा विरुद्ध
हांजी हांजी नाही करणार कदापि
स्वाभिमान आहे आमचा स्वभावसिद्ध
तुमच्या तुकड्यांवर जगण्या इतका
नाही मी गलितगात्र लाचार
विचार तुमचे जरी पुरोगामी
प्रतिगामी आहेत तुमचे आचार
तुमची धाव नेहमी तुमच्यापर्यंत
हा नेहमीचा अनुभव आहे
फायद्यासाठी माणसांची खरेदी विक्री
याचा तर तुम्हाला सराव आहे
मेलेल्यांच्या मढ्यावरचे लोणी खाणारे तुम्ही
मी तर असा हा जिवंत आहे
पायात चालण्याचे जरी नसले बळ
तरी मनात लढण्यासाठी पुरेसा अंगार आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक सा. कोकणनामा
गुढीपाडवा, नववर्षाच्या शुभेच्छा!
माझी पोरं मराठी शाळेत जात नाय
गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभायात्रेत मी हाय
माझ्या पोराला रामायण, महाभारत माहीत नाय
गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभायात्रेत मी हाय
माझ्या पोरांना मराठी महिने पाठ नाय
गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभायात्रेत मी हाय
माझ्या पोरांना सेंट माहीत हाय, संत नाय
गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभायात्रेत मी हाय
माझी मराठी, माझा पोरगा बोलत नाय
गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभायात्रेत मी हाय
संस्कृती जपण्याचा माझा प्रयत्न हाय
गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभायात्रेत मी हाय
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
माणूस
माणसातील माणूस
जिवंत आहे कुठे?
ग्रुप बनलेत
शिळ्या कढीचे मसनवटे
माझी ओळख
मी या जातीचा-पातीचा
कुठला ग्रुप माझा
हाच विचार आता वर्चस्वाचा
लाईक ठोकीन, पाईक होईन
पांढरपेशी वृत्तीचा
पोस्टींच्या बाजारात
स्पृशास्पृश्यतेचा धर्म माझा
अरे, का तू न् मी
माणसातला माणूस वाटावा
फेसबुक, व्हाटसपच्या युगातही
माणसाला माणूस दिशादर्शक वाटावा
-उमाजी म. केळुसकर
जय भीम बोला
जय भीम बोला, जय भीम बोला
बाबासाहेबांनी दिला जातीअंताचा टोला
माय बाबासाहेब, बाप बाबासाहेब
ज्ञान बाबासाहेब, प्रकाश बाबासाहेब
सांगितले त्यांनी शिका काॅलेज शाळा
मान बाबासाहेब, सन्मान बाबासाहेब
शक्ती बाबासाहेब, युक्ती बाबासाहेब
मंत्र दिला संघटित करा आपुल्या बळा
प्रज्ञा बाबासाहेब, शील बाबासाहेब
संयम बाबासाहेब, नियम बाबासाहेब
संघर्षाचा विचार दिला त्यांनी दुर्बळा
घटना बाबासाहेब, संघटना बाबासाहेब
मार्ग बाबासाहेब, दिशा बाबासाहेब
दिला त्यांनी दीनांना लोकशाहीचा गळा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, कोकणनामा
छोटी ताई
माझी ताई छोटीशी
तिची बाहुली इवलीशी
माझ्या ताईचे डोळे
ससे जणू भोळे
माझ्या ताईचं चालणं
मोराचं थुईथुई नाचणं
माझ्या ताईचं हसणं
ताऱ्यांचं लुकलुकणं
माझ्या ताईचा घास
चिऊलाही चढेल मास
माझ्या ताईचा राग
घाबरेल तिला वाघ
माझ्या ताईचे लाड
लाडूचे लावलेय झाड
------उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
माझी ताई छोटीशी
तिची बाहुली इवलीशी
माझ्या ताईचे डोळे
ससे जणू भोळे
माझ्या ताईचं चालणं
मोराचं थुईथुई नाचणं
माझ्या ताईचं हसणं
ताऱ्यांचं लुकलुकणं
माझ्या ताईचा घास
चिऊलाही चढेल मास
माझ्या ताईचा राग
घाबरेल तिला वाघ
माझ्या ताईचे लाड
लाडूचे लावलेय झाड
------उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
अरे नरा!
अरे असा कसा झालास नरा
आई-बाप नाही तुझे घरा
जन्म दिला त्यांनी तुला
तुझ्यासाठी बांधला झुला
चालविले धरुन तुझ्या करा
ठेवला तुझ्याच सुखाचा ध्यास
घडला जरी स्वत:ला उपवास
रोखला संकटाचा वादळवारा
आणली सून देखणी घरात
वाटले सौख्य नांदावे घरात
पण वाटती आई-बाप परके दारा
आई-बाप अडगळ फार
हेच त्यांचे काय संस्कार
म्हणून फेकले त्यांना बाहेरा
तुही होशील कधीतरी वृद्ध
मुला-सुनांनी वागावे का असंबद्ध
नाही देणार आई-बाप शाप असा पोरा
अरे माघारा आणा त्यांना
धरा आपुल्या दोन्ही काना
त्यांचे पश्चातापाने पाय धरा
---उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
अरे असा कसा झालास नरा
आई-बाप नाही तुझे घरा
जन्म दिला त्यांनी तुला
तुझ्यासाठी बांधला झुला
चालविले धरुन तुझ्या करा
ठेवला तुझ्याच सुखाचा ध्यास
घडला जरी स्वत:ला उपवास
रोखला संकटाचा वादळवारा
आणली सून देखणी घरात
वाटले सौख्य नांदावे घरात
पण वाटती आई-बाप परके दारा
आई-बाप अडगळ फार
हेच त्यांचे काय संस्कार
म्हणून फेकले त्यांना बाहेरा
तुही होशील कधीतरी वृद्ध
मुला-सुनांनी वागावे का असंबद्ध
नाही देणार आई-बाप शाप असा पोरा
अरे माघारा आणा त्यांना
धरा आपुल्या दोन्ही काना
त्यांचे पश्चातापाने पाय धरा
---उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
काडी
मला नाही काम
तुम्ही गाळा घाम
मी लावतो काडी
तुम्ही काढा खोडी
मी मारतो दडी
तुम्ही मारा उडी
मी बसतो दूर
तुम्ही काढा धूर
माझी बंद दारे
तुम्ही गोळ्या खा रे
मी आहे सर्वज्ञ
तुम्ही सारे अज्ञ
माझे जाते काय
मी हुशार हाय
---उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
मला नाही काम
तुम्ही गाळा घाम
मी लावतो काडी
तुम्ही काढा खोडी
मी मारतो दडी
तुम्ही मारा उडी
मी बसतो दूर
तुम्ही काढा धूर
माझी बंद दारे
तुम्ही गोळ्या खा रे
मी आहे सर्वज्ञ
तुम्ही सारे अज्ञ
माझे जाते काय
मी हुशार हाय
---उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
आई, आई
आई, आई ह्रदयात ती नित्य राही
प्रेमस्पर्श तिचा सदा मन कुरवाळी
आई कुशीतला वत्सल विसावा
मायेचा तिथे कधी नसे देखावा
आई असता जगती कोणते भय
ममता तिची करिते मज निर्भय
आईचे जीणे निखाऱ्यांवर चालणे
परी वेदना शमवते तिचे बोलणे
ज्योत चैतन्याची मनात वसते आई
गीत तिचे हे नित्य नवे उमाजी गाई
----उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
आई, आई ह्रदयात ती नित्य राही
प्रेमस्पर्श तिचा सदा मन कुरवाळी
आई कुशीतला वत्सल विसावा
मायेचा तिथे कधी नसे देखावा
आई असता जगती कोणते भय
ममता तिची करिते मज निर्भय
आईचे जीणे निखाऱ्यांवर चालणे
परी वेदना शमवते तिचे बोलणे
ज्योत चैतन्याची मनात वसते आई
गीत तिचे हे नित्य नवे उमाजी गाई
----उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
टांगा
टांगा चालवणाऱ्या आसारामसाठी
भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा
दोन टांगामधील त्याच्या
अवयवाला छाटून तरसापुढे टांगा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
टांगा चालवणाऱ्या आसारामसाठी
भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा
दोन टांगामधील त्याच्या
अवयवाला छाटून तरसापुढे टांगा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
विश्वास
तिची चाहुल लागताच
अडकळते माझे पाऊल
तिच्या श्वासात माझा
विश्वास जोडणारा पूल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
तिची चाहुल लागताच
अडकळते माझे पाऊल
तिच्या श्वासात माझा
विश्वास जोडणारा पूल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
वाट
ती तिथे मी
अद्वैत दाट आहे
न संपणारी ही
अटळ वाट आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
ती तिथे मी
अद्वैत दाट आहे
न संपणारी ही
अटळ वाट आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
रिफायनरी की निसर्ग
भाषणात हाच प्रश्न आहे
कोकणच्या विकासाचे
उत्तर मात्र बासनात आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
देहीदेही
देही तुझ्या बहावा
फुलताना मी पहावा
माझा देह तुझ्यासाठी
कस्तुरी गंध व्हावा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
म्यावम्याव
बेडकं पावसाच्या चाहुलीने
करतात डराॅव डराॅव
वाघासारखे नेते निवडणुकीत
मतांसाठी करतात म्यावम्याव
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
द्वेष
रुपात ईश नाही
वाणीत विष आहे
द्वेषात सद्सद्विवेकबुद्धी
शेणात गहाण आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
मोल
जगण्याचा जातो
जेव्हा तोल
तेव्हा कळते
जगण्याचे मोल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
जगण्याचा जातो
जेव्हा तोल
तेव्हा कळते
जगण्याचे मोल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
अभिमान
मला गर्व नाही, माज नाही
माणुसकी हा माझा साज आहे
भाटगिरी नाही, चाटुगिरी नाही
अभिमान हा माझा आवाज आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
मला गर्व नाही, माज नाही
माणुसकी हा माझा साज आहे
भाटगिरी नाही, चाटुगिरी नाही
अभिमान हा माझा आवाज आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
नाट्यसमीक्षा
नाटक पहाण्याआधीच
लिहिले जर नाट्यसमीक्षण
तर खऱ्या आयुष्याचे कसे
नोंदवले जाईल निरीक्षण
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
नाटक पहाण्याआधीच
लिहिले जर नाट्यसमीक्षण
तर खऱ्या आयुष्याचे कसे
नोंदवले जाईल निरीक्षण
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
कविता
तू चालती बोलती कविता
तूच असतेस असता नसता
शब्दांची तुझी पैंजणे रुणझुणता
कवितांचा मळा राहतो फुलता
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
अर्थवाही
माझी कविता नाही जरी
बिनवासाच्या गुलाबाइतकी मोहक
पण आहे ती अर्थवाही
अन् रानफुलासारखी मादक
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
माझी कविता नाही जरी
बिनवासाच्या गुलाबाइतकी मोहक
पण आहे ती अर्थवाही
अन् रानफुलासारखी मादक
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
कोण दगड?
अरे, आपल्या निष्पाप मुलीला मारलेय
बलात्कार झालाय, चमत्कार नव्हे
देवाच्या मूर्तीकडून अपेक्षा ठेवायला!
देव दगडाचा असतो
माहीत नाही का तुम्हाला
की तुम्हीच दगड आहात म्हणून
दगडाच्या मूर्तीने सजीव व्हायची
वाट पहात आहात
तसेही भडव्यांना जंगल काय,
बस काय, शाळा काय, बगिचा काय,
रुग्णालय काय, आश्रम काय,
स्मशान काय, मंदिर काय
वासना शमवायला त्यांना
जागेची कमी काय?
देशाच्या फाळणीपासून
जम्मू-काश्मिरातील केशराच्या शेतात
विषपेरणी झाल्यानंतर हेच चाललय
नावाचं लेबल फक्त बदललेय
आधी ते, आता हे,
पण घडत आहे तेच- बलात्कार
तेव्हाही आणि आताही पीडितेचे
माय-बाप होतात कष्टी
पण उशिरा का होईना,
कुंपणावरच्या लोकांना
आलेय का हो खरी दृष्टी?
आता देवावर विश्वास नाही ते
देवाच्या नावाने बोटं मोडताहेत
त्यांना माहीत आहे
देवही मंदिरातून चोरीस जातात
तरीही ते म्हणताहेत, बलात्कार होताना
देव काय करीत होता?
देवाने डोळ्यावर पट्टी बांधली होती का?
त्यांना पक्कं माहीत आहे
देवाने नाही तर आपणच आपल्या
डोळ्यांवर पट्टी बांधली आहे म्हणूनच
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत
काल आणि आजही सुरक्षित नाही कन्या
कोणाला भारतीय असल्याची लाज वाटतेय
स्वत:त झाकून पाहिलं तर कदाचित
माणूस असल्याचीही लाज वाटेल
कारण संधी पाहून आपण राजकारण करतो
जात-धर्म पाहून आपल्या संवेदना जागृत करतो
पुरोगामी आणि प्रतिगामित्वाची व्याख्या ठरवतो
कितीही पेटवल्या मेणबत्त्या आणि मशाली
कितीही वाटली भारतीयत्वाची लाज
वस्तुस्थिती अशी आहे,
भारतकन्या बलात्कारात कालही, आजही
होरपळत आहेत, मरत आहेत
मारल्या जात आहेत, उद्याचा
भरवसा कोण देणार आहे?
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
अरे, आपल्या निष्पाप मुलीला मारलेय
बलात्कार झालाय, चमत्कार नव्हे
देवाच्या मूर्तीकडून अपेक्षा ठेवायला!
देव दगडाचा असतो
माहीत नाही का तुम्हाला
की तुम्हीच दगड आहात म्हणून
दगडाच्या मूर्तीने सजीव व्हायची
वाट पहात आहात
तसेही भडव्यांना जंगल काय,
बस काय, शाळा काय, बगिचा काय,
रुग्णालय काय, आश्रम काय,
स्मशान काय, मंदिर काय
वासना शमवायला त्यांना
जागेची कमी काय?
देशाच्या फाळणीपासून
जम्मू-काश्मिरातील केशराच्या शेतात
विषपेरणी झाल्यानंतर हेच चाललय
नावाचं लेबल फक्त बदललेय
आधी ते, आता हे,
पण घडत आहे तेच- बलात्कार
तेव्हाही आणि आताही पीडितेचे
माय-बाप होतात कष्टी
पण उशिरा का होईना,
कुंपणावरच्या लोकांना
आलेय का हो खरी दृष्टी?
आता देवावर विश्वास नाही ते
देवाच्या नावाने बोटं मोडताहेत
त्यांना माहीत आहे
देवही मंदिरातून चोरीस जातात
तरीही ते म्हणताहेत, बलात्कार होताना
देव काय करीत होता?
देवाने डोळ्यावर पट्टी बांधली होती का?
त्यांना पक्कं माहीत आहे
देवाने नाही तर आपणच आपल्या
डोळ्यांवर पट्टी बांधली आहे म्हणूनच
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत
काल आणि आजही सुरक्षित नाही कन्या
कोणाला भारतीय असल्याची लाज वाटतेय
स्वत:त झाकून पाहिलं तर कदाचित
माणूस असल्याचीही लाज वाटेल
कारण संधी पाहून आपण राजकारण करतो
जात-धर्म पाहून आपल्या संवेदना जागृत करतो
पुरोगामी आणि प्रतिगामित्वाची व्याख्या ठरवतो
कितीही पेटवल्या मेणबत्त्या आणि मशाली
कितीही वाटली भारतीयत्वाची लाज
वस्तुस्थिती अशी आहे,
भारतकन्या बलात्कारात कालही, आजही
होरपळत आहेत, मरत आहेत
मारल्या जात आहेत, उद्याचा
भरवसा कोण देणार आहे?
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
मानवतेची सल
विष्णोई मानतात
काळविटाला खराखुरा देव
सलमानला नडली
शिकारीची नसती उठाठेव
काळवीट, माणूस, पक्षी
सर्वांत आहे जीव समान
तरीही माणूस चिरडल्यावर
सलामत राहिला सलमान
अखेर काळालाही आला
अन्यायाचा मोठा वीट
सलमानला शिक्षा सुनावून
त्याने न्याय केला धीट
येथे न्याय मिळत नाही
ही आहे मानवतेची सल
धीट न्याय नीट मिळावा
यासाठीही लावा खरे बल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
विष्णोई मानतात
काळविटाला खराखुरा देव
सलमानला नडली
शिकारीची नसती उठाठेव
काळवीट, माणूस, पक्षी
सर्वांत आहे जीव समान
तरीही माणूस चिरडल्यावर
सलामत राहिला सलमान
अखेर काळालाही आला
अन्यायाचा मोठा वीट
सलमानला शिक्षा सुनावून
त्याने न्याय केला धीट
येथे न्याय मिळत नाही
ही आहे मानवतेची सल
धीट न्याय नीट मिळावा
यासाठीही लावा खरे बल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
भोक
मी आमदार झालो
असे मला स्वप्न पडले
जागे झालो तेव्हा मला
माझ्या बनियनला भोक दिसले
मी खासदार झालो
असे मला स्वप्न पडले
जागे झालो तेव्हा मला
सायकलचे पंक्चर चाक दिसले
मी मंत्री झालो
असे मला स्वप्न पडले
जागे झालो तेव्हा मला
पडक्या घराचे वासे दिसले
मी पंतप्रधान झालो
असे मला स्वप्न पडले
जागे झालो तेव्हा मला
हिच्या डोक्यावर पाण्याचे हंडे दिसले
मी राष्ट्रपती झालो
असे मला स्वप्न पडले
जागे झालो तेव्हा
माझे मन मलाच हसले
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
वाट
ती तिथे मी
अद्वैत दाट आहे
न संपणारी ही
अटळ वाट आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
संकटे येवोत कितीही
वादळी अन् कडवी
निराशेला जिद्द माझी
क्षण नि क्षण अडवी
- उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
महाराष्ट्र माझा
श्वासात महाराष्ट्र, भूषण आहे भारता
रक्तात मराठी भाषा अन् मराठी ताठा
नसानसात वाहती माझ्या समुद्र सरिता
मस्तकात सह्याद्री हिमालयाहुनी मोठा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
गिधाडे
बलात्कार तो बलात्कार असतो
ती विकृती नसते योग्य कधीही
ती देशाची बेटी, ही मात्र भाभी?
गिधाडांनो, नियत तुमची नागडी
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
रयतेची ह्रदय ज्योती
मायबाप राजे आमुचे शिवबा गेले
आसवांनी गडकिल्ले झाले ओले
चैत्र पौर्णिमा श्रीहनुमान जयंती
मालवली रयतेची ह्रदय ज्योती
वाऱ्यांतून शब्द झंकारती राजे राजे
शिवपराक्रमाचा तेथे डिंडिम वाजे
गंगासागराची रायगडावर अमृत प्रिती
नाही तेथे कळीकाळाची हो भिती
शिवसमाधी, स्वराज्य, सप्तसिंधु तेथे
जीवन तरण्या टेकविता तेथे माथे
दु:खा येते अनिवार उधाण... भरती
परि चिरंजीव जगती शिवबांची स्मृती
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
विचार
दगडही तुमचा, कायदाही तुमचा
माणूस मरतोय या देशाचा
जात तुमची, धर्म तुमचा
गळा आवळताय या देशाचा
मनातील व्देषाला अस्मितेचा मुलामा
हा फसवा देखावा काय कामाचा
शिकून देखिल दगड राहिलास
अधिकार तुझ्या काय कामाचा
तोंड जहर ओकण्यासाठी नाही
संवादाचं साधन आहे ते
डोळे विद्ध्वंस पहाण्यासाठी नाही
सत्यम सुंदरासाठी आहेत ते
तुमच्या अज्ञानातून देश बुडतोय
घामातून तो घडला पाहिजे
जातीय दंगली, धार्मिक त्वेषाएेवजी
ज्ञानाचा विचार रुजला पाहिजे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
'अर्थ'पूर्ण चहा
चहासाठी दिवसाला
मोजतात रुपये लाख
डोळे मिटून दूध पिणाऱ्या
बोक्यांचा तिथे धाक
फायली कुरतडून तेथे
उंदरांना येतो माज
आणिक असतो कुणाला
चहाचा 'अर्थ'पूर्ण साज
बोका कोण, उंदीर कोण
सारेच येथे संदिग्ध
मंत्रालयातल्या खेळाने
जनता झालेय दग्ध
याचा अर्थ असा नाही
आधी होते ठीक
इतकेच की आता नाही
माहिती कुणाची बटिक
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
उंदीर आणि बोका
मंत्रालयात माणसांपेक्षा
उंदरांचा सुळसुळाट आहे
प्रत्येक फायलींच्या कागदावर
त्यांची बारीक नजर आहे
कुठला कागद कुरतडावा सोडावा
निश्चय उंदरांचा ठाम आहे
येथे सर्वच उलटे दिसते
बोक्याचा उंदीर मित्र आहे
बोक्यांनी ठरवले जरी
उंदीर मारायचा बनाव आहे
डोळे मिटून बोक्यांनी
दूध पिण्याचा तो ठराव आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, कोकणनामा
वादळी अन् कडवी
निराशेला जिद्द माझी
क्षण नि क्षण अडवी
- उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
महाराष्ट्र माझा
श्वासात महाराष्ट्र, भूषण आहे भारता
रक्तात मराठी भाषा अन् मराठी ताठा
नसानसात वाहती माझ्या समुद्र सरिता
मस्तकात सह्याद्री हिमालयाहुनी मोठा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
गिधाडे
बलात्कार तो बलात्कार असतो
ती विकृती नसते योग्य कधीही
ती देशाची बेटी, ही मात्र भाभी?
गिधाडांनो, नियत तुमची नागडी
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
रयतेची ह्रदय ज्योती
मायबाप राजे आमुचे शिवबा गेले
आसवांनी गडकिल्ले झाले ओले
चैत्र पौर्णिमा श्रीहनुमान जयंती
मालवली रयतेची ह्रदय ज्योती
वाऱ्यांतून शब्द झंकारती राजे राजे
शिवपराक्रमाचा तेथे डिंडिम वाजे
गंगासागराची रायगडावर अमृत प्रिती
नाही तेथे कळीकाळाची हो भिती
शिवसमाधी, स्वराज्य, सप्तसिंधु तेथे
जीवन तरण्या टेकविता तेथे माथे
दु:खा येते अनिवार उधाण... भरती
परि चिरंजीव जगती शिवबांची स्मृती
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
विचार
दगडही तुमचा, कायदाही तुमचा
माणूस मरतोय या देशाचा
जात तुमची, धर्म तुमचा
गळा आवळताय या देशाचा
मनातील व्देषाला अस्मितेचा मुलामा
हा फसवा देखावा काय कामाचा
शिकून देखिल दगड राहिलास
अधिकार तुझ्या काय कामाचा
तोंड जहर ओकण्यासाठी नाही
संवादाचं साधन आहे ते
डोळे विद्ध्वंस पहाण्यासाठी नाही
सत्यम सुंदरासाठी आहेत ते
तुमच्या अज्ञानातून देश बुडतोय
घामातून तो घडला पाहिजे
जातीय दंगली, धार्मिक त्वेषाएेवजी
ज्ञानाचा विचार रुजला पाहिजे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
'अर्थ'पूर्ण चहा
चहासाठी दिवसाला
मोजतात रुपये लाख
डोळे मिटून दूध पिणाऱ्या
बोक्यांचा तिथे धाक
फायली कुरतडून तेथे
उंदरांना येतो माज
आणिक असतो कुणाला
चहाचा 'अर्थ'पूर्ण साज
बोका कोण, उंदीर कोण
सारेच येथे संदिग्ध
मंत्रालयातल्या खेळाने
जनता झालेय दग्ध
याचा अर्थ असा नाही
आधी होते ठीक
इतकेच की आता नाही
माहिती कुणाची बटिक
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
उंदीर आणि बोका
मंत्रालयात माणसांपेक्षा
उंदरांचा सुळसुळाट आहे
प्रत्येक फायलींच्या कागदावर
त्यांची बारीक नजर आहे
कुठला कागद कुरतडावा सोडावा
निश्चय उंदरांचा ठाम आहे
येथे सर्वच उलटे दिसते
बोक्याचा उंदीर मित्र आहे
बोक्यांनी ठरवले जरी
उंदीर मारायचा बनाव आहे
डोळे मिटून बोक्यांनी
दूध पिण्याचा तो ठराव आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, कोकणनामा
महाराष्ट्र माझा
श्वासात महाराष्ट्र, भूषण आहे भारता
रक्तात मराठी भाषा अन् मराठी ताठा
नसानसात वाहती माझ्या समुद्र सरिता
मस्तकात सह्याद्री हिमालयाहुनी मोठा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
श्वासात महाराष्ट्र, भूषण आहे भारता
रक्तात मराठी भाषा अन् मराठी ताठा
नसानसात वाहती माझ्या समुद्र सरिता
मस्तकात सह्याद्री हिमालयाहुनी मोठा
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
गिधाडे
बलात्कार तो बलात्कार असतो
ती विकृती नसते योग्य कधीही
ती देशाची बेटी, ही मात्र भाभी?
गिधाडांनो, नियत तुमची नागडी
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
बलात्कार तो बलात्कार असतो
ती विकृती नसते योग्य कधीही
ती देशाची बेटी, ही मात्र भाभी?
गिधाडांनो, नियत तुमची नागडी
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
रयतेची ह्रदय ज्योती
मायबाप राजे आमुचे शिवबा गेले
आसवांनी गडकिल्ले झाले ओले
चैत्र पौर्णिमा श्रीहनुमान जयंती
मालवली रयतेची ह्रदय ज्योती
वाऱ्यांतून शब्द झंकारती राजे राजे
शिवपराक्रमाचा तेथे डिंडिम वाजे
गंगासागराची रायगडावर अमृत प्रिती
नाही तेथे कळीकाळाची हो भिती
शिवसमाधी, स्वराज्य, सप्तसिंधु तेथे
जीवन तरण्या टेकविता तेथे माथे
दु:खा येते अनिवार उधाण... भरती
परि चिरंजीव जगती शिवबांची स्मृती
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
मायबाप राजे आमुचे शिवबा गेले
आसवांनी गडकिल्ले झाले ओले
चैत्र पौर्णिमा श्रीहनुमान जयंती
मालवली रयतेची ह्रदय ज्योती
वाऱ्यांतून शब्द झंकारती राजे राजे
शिवपराक्रमाचा तेथे डिंडिम वाजे
गंगासागराची रायगडावर अमृत प्रिती
नाही तेथे कळीकाळाची हो भिती
शिवसमाधी, स्वराज्य, सप्तसिंधु तेथे
जीवन तरण्या टेकविता तेथे माथे
दु:खा येते अनिवार उधाण... भरती
परि चिरंजीव जगती शिवबांची स्मृती
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
विचार
दगडही तुमचा, कायदाही तुमचा
माणूस मरतोय या देशाचा
जात तुमची, धर्म तुमचा
गळा आवळताय या देशाचा
मनातील व्देषाला अस्मितेचा मुलामा
हा फसवा देखावा काय कामाचा
शिकून देखिल दगड राहिलास
अधिकार तुझ्या काय कामाचा
तोंड जहर ओकण्यासाठी नाही
संवादाचं साधन आहे ते
डोळे विद्ध्वंस पहाण्यासाठी नाही
सत्यम सुंदरासाठी आहेत ते
तुमच्या अज्ञानातून देश बुडतोय
घामातून तो घडला पाहिजे
जातीय दंगली, धार्मिक त्वेषाएेवजी
ज्ञानाचा विचार रुजला पाहिजे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
दगडही तुमचा, कायदाही तुमचा
माणूस मरतोय या देशाचा
जात तुमची, धर्म तुमचा
गळा आवळताय या देशाचा
मनातील व्देषाला अस्मितेचा मुलामा
हा फसवा देखावा काय कामाचा
शिकून देखिल दगड राहिलास
अधिकार तुझ्या काय कामाचा
तोंड जहर ओकण्यासाठी नाही
संवादाचं साधन आहे ते
डोळे विद्ध्वंस पहाण्यासाठी नाही
सत्यम सुंदरासाठी आहेत ते
तुमच्या अज्ञानातून देश बुडतोय
घामातून तो घडला पाहिजे
जातीय दंगली, धार्मिक त्वेषाएेवजी
ज्ञानाचा विचार रुजला पाहिजे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
'अर्थ'पूर्ण चहा
चहासाठी दिवसाला
मोजतात रुपये लाख
डोळे मिटून दूध पिणाऱ्या
बोक्यांचा तिथे धाक
फायली कुरतडून तेथे
उंदरांना येतो माज
आणिक असतो कुणाला
चहाचा 'अर्थ'पूर्ण साज
बोका कोण, उंदीर कोण
सारेच येथे संदिग्ध
मंत्रालयातल्या खेळाने
जनता झालेय दग्ध
याचा अर्थ असा नाही
आधी होते ठीक
इतकेच की आता नाही
माहिती कुणाची बटिक
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
चहासाठी दिवसाला
मोजतात रुपये लाख
डोळे मिटून दूध पिणाऱ्या
बोक्यांचा तिथे धाक
फायली कुरतडून तेथे
उंदरांना येतो माज
आणिक असतो कुणाला
चहाचा 'अर्थ'पूर्ण साज
बोका कोण, उंदीर कोण
सारेच येथे संदिग्ध
मंत्रालयातल्या खेळाने
जनता झालेय दग्ध
याचा अर्थ असा नाही
आधी होते ठीक
इतकेच की आता नाही
माहिती कुणाची बटिक
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
उंदीर आणि बोका
मंत्रालयात माणसांपेक्षा
उंदरांचा सुळसुळाट आहे
प्रत्येक फायलींच्या कागदावर
त्यांची बारीक नजर आहे
कुठला कागद कुरतडावा सोडावा
निश्चय उंदरांचा ठाम आहे
येथे सर्वच उलटे दिसते
बोक्याचा उंदीर मित्र आहे
बोक्यांनी ठरवले जरी
उंदीर मारायचा बनाव आहे
डोळे मिटून बोक्यांनी
दूध पिण्याचा तो ठराव आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, कोकणनामा
मंत्रालयात माणसांपेक्षा
उंदरांचा सुळसुळाट आहे
प्रत्येक फायलींच्या कागदावर
त्यांची बारीक नजर आहे
कुठला कागद कुरतडावा सोडावा
निश्चय उंदरांचा ठाम आहे
येथे सर्वच उलटे दिसते
बोक्याचा उंदीर मित्र आहे
बोक्यांनी ठरवले जरी
उंदीर मारायचा बनाव आहे
डोळे मिटून बोक्यांनी
दूध पिण्याचा तो ठराव आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, कोकणनामा
मोल
जगण्याचा जातो
जेव्हा तोल
तेव्हा कळते
जगण्याचे मोल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
जगण्याचा जातो
जेव्हा तोल
तेव्हा कळते
जगण्याचे मोल
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
अभिमान
मला गर्व नाही, माज नाही
माणुसकी हा माझा साज आहे
भाटगिरी नाही, चाटुगिरी नाही
अभिमान हा माझा आवाज आहे
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
बोट
जीवनाच्या प्रवासात बोट सोडते आई
जगती नसूनही घरा-मनात असते आई
खवळलेल्या सागरातील दीपस्तंभ आई
अवघड आयुष्याची बोट तारते आई
- उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
कोळसा
तू चेहऱ्याची घडी मोडू नको
कौतुकाचा शब्द काढू नको
जिंदगी तुझी जळण्यात गेली
तुझा कोळसा तुला लखलाभ असो
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
तू चेहऱ्याची घडी मोडू नको
कौतुकाचा शब्द काढू नको
जिंदगी तुझी जळण्यात गेली
तुझा कोळसा तुला लखलाभ असो
-उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
असतो मी
असतो कुठे मी गर्दीच्या कल्लोळात
असतो मी फुलांत, दवबिंदूंच्या जलात
असतो कुठे मी गर्वाच्या नशेत
असतो मी सदा नत, आम्रफलांत
असतो कुठे मी रात्रीच्या अंधारात
असतो मी सत्कर्मात, रवितेजात
असतो कुठे मी अक्षर नि शब्दांत
असतो मी मौनात, पक्ष्यांच्या गुंजनात
असतो कुठे मी माझ्याच रंगात
असतो मी निर्झरात, सरितासागरात
असतो कुठे मी सोन्याचांदीच्या चमकेत
असतो मी दगडमातीत, सह्याद्रीच्या उबेत
------उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामाशिवछत्रपती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
श्री शहाजी नंदन, आधी किल्ले शिवनेरीला वंदन
धन्य ती भूमी, जेथ जन्मले शौर्यवदन, आमुची शक्ती
दशदिशांत पसरली शिवछत्रपतींची कीर्ती
माय जिजाऊंचे पुत्र, नेक शिवबांचे चरित्र
जिवाला जीव देणारे त्यांचे लहान-थोर मित्र
शिवरायांची थोरवी गाताना गात्र कधी न थकती
स्वराज्याच्या जिद्दीपुढे शत्रू भलेभले सरती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
लाल महाली उन्मत्त शाहिस्त्याची बोटे छाटूनी
प्रतापगडी गर्विष्ठ राक्षस अफजल्या फाडुनी, गाडुनी
भयमुक्त केली शिवरायांनी रयत आणि धरणी
लावूया त्यांच्या गडकिल्ल्यांची कपाळी माती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
वीर शिवरायांनी दिली चातुर्वर्ण्या मूठमाती
तानाजी, बाजी, मावळे सारे त्यांचे साथी
गनिमा दाखविल्या न त्यांनी कधी पाठी
लढले बारा बलुतेदारही प्राण घेऊनी तळहाती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
आग्र्यात शिवराय जणू कडाडती वीज
शंभूसवे शिवबा कसे झाले गायब
मोगल साम्राज्या ना कसली गाज होती
येता मुलुखात, औरंग्याची धुळीस गेली मती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
आदिलशाही, मोगल साम्राज्य, इंग्रज आणि सिद्दी
जिद्दी शिवरायांनी चालू नाही दिली त्यांची सद्दी
गड-जलदुर्ग, उभारल्या आरमाराची उभी केली भिती
घोड्यावर जशी मांड, तशी त्यांची सागरावरही होती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
राजगडा कारभार पाहिला, रयतेला स्वाभिमान दिला
बुलंद किल्ले रायगडा स्थापिली राजधानी
फडकली स्वराज्याची भगवी पताका गगनी
मराठेमोळे राजे झाले आमुचे शिवछत्रपती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
मराठी भाषा, मराठमोळे राज्य, राजे आमचे प्रजाहितदक्ष
उत्कृष्ट योद्धा, आदर्श राज्यकर्ता ही भारतभूमी साक्ष
शिवरायांचे नाव घेता उन्नत होते आमुची पहाडी छाती
नतमस्तक आमुचे, आदर्श आमच्या शिवछत्रपतींची नीती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
श्री शहाजी नंदन, आधी किल्ले शिवनेरीला वंदन
धन्य ती भूमी, जेथ जन्मले शौर्यवदन, आमुची शक्ती
दशदिशांत पसरली शिवछत्रपतींची कीर्ती
माय जिजाऊंचे पुत्र, नेक शिवबांचे चरित्र
जिवाला जीव देणारे त्यांचे लहान-थोर मित्र
शिवरायांची थोरवी गाताना गात्र कधी न थकती
स्वराज्याच्या जिद्दीपुढे शत्रू भलेभले सरती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
लाल महाली उन्मत्त शाहिस्त्याची बोटे छाटूनी
प्रतापगडी गर्विष्ठ राक्षस अफजल्या फाडुनी, गाडुनी
भयमुक्त केली शिवरायांनी रयत आणि धरणी
लावूया त्यांच्या गडकिल्ल्यांची कपाळी माती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
वीर शिवरायांनी दिली चातुर्वर्ण्या मूठमाती
तानाजी, बाजी, मावळे सारे त्यांचे साथी
गनिमा दाखविल्या न त्यांनी कधी पाठी
लढले बारा बलुतेदारही प्राण घेऊनी तळहाती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
आग्र्यात शिवराय जणू कडाडती वीज
शंभूसवे शिवबा कसे झाले गायब
मोगल साम्राज्या ना कसली गाज होती
येता मुलुखात, औरंग्याची धुळीस गेली मती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
आदिलशाही, मोगल साम्राज्य, इंग्रज आणि सिद्दी
जिद्दी शिवरायांनी चालू नाही दिली त्यांची सद्दी
गड-जलदुर्ग, उभारल्या आरमाराची उभी केली भिती
घोड्यावर जशी मांड, तशी त्यांची सागरावरही होती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
राजगडा कारभार पाहिला, रयतेला स्वाभिमान दिला
बुलंद किल्ले रायगडा स्थापिली राजधानी
फडकली स्वराज्याची भगवी पताका गगनी
मराठेमोळे राजे झाले आमुचे शिवछत्रपती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
मराठी भाषा, मराठमोळे राज्य, राजे आमचे प्रजाहितदक्ष
उत्कृष्ट योद्धा, आदर्श राज्यकर्ता ही भारतभूमी साक्ष
शिवरायांचे नाव घेता उन्नत होते आमुची पहाडी छाती
नतमस्तक आमुचे, आदर्श आमच्या शिवछत्रपतींची नीती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती
------उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
तिचा सारांश
तिचे असणे
गुलाब दरवणे
तिचे नसणे
विरहाचे गाणे
तिचे असणे
गुलाब दरवणे
तिचे नसणे
विरहाचे गाणे
तिच्या हसण्याला
मोगऱ्याचा गंध
तिच्या रुसण्याने
जगण्याला अर्थ
मोगऱ्याचा गंध
तिच्या रुसण्याने
जगण्याला अर्थ
तिची नजर
जल भोवरा
तिचा विसर
भ्रम गहिरा
जल भोवरा
तिचा विसर
भ्रम गहिरा
तिचे शब्द
स्वर संमोहन
ती निशब्द
बद्ध मनमोहन
स्वर संमोहन
ती निशब्द
बद्ध मनमोहन
तिची चाहूल
ह्रदयी हूल
ती थबकता
अविरत भूल
ह्रदयी हूल
ती थबकता
अविरत भूल
तिचा श्वास
सदा भास
नि:श्वास तिचा
नित्य आभास
सदा भास
नि:श्वास तिचा
नित्य आभास
तिचा सारांश
खरा पाश
तिचे 'ती'पण
आहे खास
------उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा
खरा पाश
तिचे 'ती'पण
आहे खास
------उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा