-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
कोकण रेल्वेचा सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकणातील जिल्ह्यांना कोणता फायदा झाला, याचा जर आलेख काढला तर त्याचे उत्तर नकारात्मकच येईल. कोकणातून रेल्वे जाते हे एकच समाधान कोकणवासियांना आहे. रायगड जिल्ह्यातील पेण स्थानकावरून अनेक अतिजलद व जलद गाड्या धावतात, पण त्यापैकी एकही गाडी पेण स्थानकात थांबत नाही. त्यामुळे कोकणात जाणारी जलद गाडी पकडण्यासाठी खालापूर, पेण, अलिबाग तालुक्यातील प्रवाशांना पनवेलला जावे लागते. यात वेळ व पैशांचा अपव्यय होतो. मुंबईच्या जवळ असूनही जिल्हा अतिशय उपेक्षित आहे. अलिबाग तर अतिशय दुर्दैवी आहे, कारण थळपर्यंत आरसीएफच्या मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग उपलब्ध असूनही अलिबागकरांना प्रवासी रेल्वेचे सुख नाही. गेले काही वर्षे अलिबागपर्यंत प्रवासी रेल्वे येणार असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी जोपर्यंत हे चित्र प्रत्यक्षात साकार होत नाही, तोपर्यंत अलिबागकरांना जलवाहतूक आणि रस्तेवाहतूक यावरच अवलंबून राहवे लागणार आहे. रेल्वेचा तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास आणि तो पार मुरुडपर्यंत गेल्यास अलिबाग-मुरुडच्याच नव्हे तर रायगड पर्यटनाला निश्चितच बाळसे येईल.
रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली रेल्वे लोहमार्गाची निर्मिती ब्रिटीश राजवटीच्या काळात अंदाजे १८९० साली झाली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. अशाप्रकारे रायगड जिल्ह्यातील रोह्यापर्यंत ३१ वर्षांपूर्वी मध्य रेल्वे पोहोचली. त्याच दरम्यान पेण ते थळ असा रेल्वे लोहमार्ग टाकला जाऊन त्यावरुन आर.सी.एफ. प्रकल्पासाठी माल वाहतूक सुरु झाली. पण या तीन दशकांत रायगड जिल्ह्यात रेल्वे प्रवासी वाहतुकीत फारशी क्रांती झाली नाही. तिचा जिल्ह्यात अन्यत्र विस्तार झाला नाही. या तीन दशकांत जिल्ह्यात राजकारण वाढले, औद्योकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले, पर्यटन वाढले, त्याबरोबर वाहतुकीचे पर्याय वाढले, पण ते पुरेसे ठरले नाहीत. आहे त्या लोहमार्गावरुन रोह्यापर्यंत प्रवासी रेल्वे गाड्यांची पुरेसी वाहतूक होत नसल्याने ती जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरली नाही. अगदी २२ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे रोहा ओलांडून जिल्ह्याबाहेर गेली तरीही ङ्गारसे नेत्रदीपक, भरीव असे काही घडले नाही. त्यामुळे कोकण रेल्वे हा देखील रायगड जिल्ह्याच्या विकासाचा फक्त बुडबुडा ठरला. तथापि, ही कोकण रेल्वे रोज तीन राज्यातून ७४१ किमीचा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यातून जातो. कोकण रेल्वेची हद्द रोहा येथून सुरु होते ती थोकुर ह्या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते.
मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, बॅ. नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
७४१ किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणार्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी या लोहमार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे कोकण रेल्वे हे एक आव्हान होते, पण अलिबागपर्यंत रेल्वे आणणे हे काही आव्हान नाही. अलिबागच्या थळ येथील आरसीएङ्ग प्रकल्पासाठी मालवाहतुकीसाठी रेल्वे लोहमार्ग टाकण्यात आला आहे आणि त्यावरुन गेले ३२ वर्षे कंपनीची मालवाहतूक होते आहे, पण राजकीय उदासिनतेमुळे या रेल्वे लोहमार्गाचा प्रवासी वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आला नाही, अथवा प्रवासी वाहतुकीसाठी दुसरा रेल्वे लोहमार्ग टाकण्यात आला नाही.
कोकण रेल्वे ज्या मार्गावरुन धावते तो लोहमार्ग रोह्यापर्यत मध्यरेल्वेच्या अधिकारक्षेत्रात, तर रोह्यापासून कोकण रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येतो. पेणहून मध्यरेल्वे अलिबागला आणायची आहे. पण पेण हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असूनही त्याचीही एक व्यथा आहे. पेण रेल्वे स्थानकात दिवा-मडगाव, दादर-रत्नागिरी, दादर-रोहा या पॅसेंजर गाड्याच थांबतात. एकही जलद किवा अतिजलद गाडी या स्थानकात थांबत नाही. त्यामुळे या स्थानकाचा उपयोग रायगडमधून कोकणात जाणार्या प्रवाशांना होत नाही. त्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पनवेल येथे जावे लागते. किमान काही जलद गाड्यांना पेण थांबा द्यावा, हॉलिडे स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा, पेण स्थानकात रिटर्न तिकीट मिळावे, अशी मागणी आहे. पण या मागणीकडे ङ्गारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. निश्चितच ही मागणी मान्य होणे गरजेचे आहे.
दिवा-रोहा-दिवा ही गाडी सध्या धावते, अलिकडे पेण-दिवा-पेण, रोहा-पनवेल-रोहा, पेण-पनवेल-पेण या गाड्या सुरु झाल्या आहेत. त्या नाममात्र आहेत. पण पनवेल-वीर-पनवेल, पनवेल-माणगाव-पनवेल, , पेण-डहाणू-पेण, पेण-सी.एस.टी. अशा गाड्या सुरु कराव्या अशाही मागण्या आहेत. त्या मागण्यांचा कोण आणि कधी विचार करणार असा प्रश्न पडतो. खरेतर कोकण रेल्वेचा मार्ग सुरू होऊन तब्बल २२ वर्षांचा कालावधी लोटला; परंतु या मार्गावर जी प्रगती व्हायला हवी होती तशी झाली नाही. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे महामंडळ यांच्या वादातच या मार्गावरील अनेक विकास कामे रखडली गेली. तब्बल ३१ वर्षांपूर्वी रोह्यापर्यंत पोहचलेल्या रेल्वेला मध्य रेल्वे पुढे नेऊ शकली नाहीच; पण या मार्गाचा विकासही करू शकली नाही. मात्र १९९७ मध्ये कोकण रेल्वेचा लोहमार्ग पूर्ण होताच मध्य रेल्वेने या मार्गावर अपेक्षेपेक्षा जास्त गाड्या केरळपर्यंत सोडून या मार्गाचा यथेच्छ लाभ उठविला. या मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा दरम्यानचा १०१ कि.मी.चा मार्ग एकेरी होता. या मार्गाचे पनवेल-पेण ३५ कि.मी. आणि पेण-रोहा ४० कि.मी. असे ७५ कि.मी.चे दोन टप्पे तयार करून सन २००९ आणि २०११ पर्यंत हा मार्ग पूर्ण करावयाचा होता. परंतु मध्य रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे हा मार्ग पूर्ण होण्यास तब्बल सहा वर्षें उशीर झाला. यातील प्रथम पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण झाले. त्यानंतर पेण ते रोहा टप्प्यातील सर्व कामे मार्च २०१७ ला पूर्ण झाली. त्यावरुन दुहेरी वाहतूक एप्रिल २०१७ ला सुरु झाली. या मार्गावरुन पनवेल-रोहा-पनवेल प्रवासी रेल्वेगाडी अलिकडेच सुरु झाली आहे. तसेच पेण-पनवेल-पेण हा मार्ग दुहेरी तयार आहे. त्या मार्गावरुन पेण-पनवेल-पेण गाडी सुरु आहे. असे असूनही अलिबाग रेल्वेचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे अलिबागला रेल्वे स्थानक कधी बांधले जाणार? पेण-अलिबाग रेल्वे मार्ग कधी तयार होणार? आणि त्यावरुन प्रवासी रेल्वे कधी धावणार? त्यासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार हा मोठा प्रश्नच आहे. अलिबागला प्रवासी रेल्वे सुरु झाल्यास त्याने जिल्ह्याच्या पर्यटनात अमूलाग्र क्रांती होणार आहे. उद्योग, कृषीक्षेत्र यांनाही ती पुरक ठरणार आहे. सर्वसमावेश भूमिकेतून अलिबाग रेल्वेचे महत्व आहे. हे महत्व अनेक वर्षे अधोरेखित होत आले आहे. त्याबाबत पावलेही उचलली जात आहेत, पण प्रगती शून्य आहे. त्यामुळे सर्व संशयास्पद आहे. हा संशय दूर होणे गरजेचे आहे. तसेच अलिबागपर्यंत रेल्वे आणण्यातील तांत्रिक बाबी काय असतील त्या असतील, त्याची पूर्तता केली गेली तर कोणतीच अडचण असायला नाही. पण प्रश्न मानसिकतेचा आहे.

प्रत्तेक वेळेस नेते मंडळीला दोष देवून फायदा नाही. ज्या जनतेचा या सुविधांवर हक्क आहे तीच जनता षंढा सारखी सर्व सहन करते . साधे आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची हिम्मत सुध्दा या आजच्या स्वयंकेंद्रित षंढ जनतेला नाही. मग अशा जनतेची अशीच होरपळ होणार यात नवल ते काय?
उत्तर द्याहटवा