-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
पूर्वी तसं होतं आणि आता असं आहे, अशी भूतकाळ-वर्तमानकाळाची तुलना सातत्याने होत आली आहे. ही तुलना जीवनातील सर्वच क्षेत्रांसंबंधी केली जाते. त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. पूर्वी डॉक्टरला देव मानले जायचे, आज डॉक्टर रुग्णाला बकरा समजतात, अशाप्रकारचे वैद्यकीय व्यवसायाबद्दलचे शेरे वारंवार ऐकू येतात. पण नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीही उदाहरणे पहायला मिळतात. ही चांगली उदाहरणेच समाज घडवत असतात, समाजाला आणि आपल्या पेशाला दिशा देण्याचा प्रयास करीत असतात, हे डॉ. रवींद्र म्हात्रे यांच्या कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल, लायनेस क्लब व लायन्स क्लब ऑफ अलिबाग, रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ व रविवार, २२ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरातून दिसून आले.

जीवन फार गुंतागुतीचे, अपघातांचे असते, या अशा प्रकारांशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत त्याबाबतच्या दु:खाचीही आपल्याला जाणीव नसते. आपण आपल्या सोयीचे तेच पाहत असतो, त्यामुळे शारीरिक व्यंग असलेल्या एका वर्गांच्या दुखाची, वेदनेची आपल्याला जाणीवच नसते. आपल्याला दु:खाचा स्पर्श नको असतो, आनंदाचा ध्यास मात्र आपण बाळगतो. पण दुसर्यांच्या आनंदाचा ध्यास आपण बाळगू तेव्हाच तेव्हाच आपल्याला त्यांच्या दु:खाची, वेदनेची जाणीव होईल, ही तळमळ असणारी माणसेही समाजात आहेत, हे प्रयासमध्ये पार पडलेल्या प्लास्टिक सर्जरी शिबिरातून दिसून आले. या शिबिरातून ५० हून अधिक जणांचे अंधारुन आलेले जीवन प्रकाशमान झाले. त्यांना प्रकाशवाट दाखवल्याबद्दल प्रयास हॉस्पिटलेच डॉ. रवींद्र म्हात्रे, प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांच्या सेवाभावाला सलाम केलाच पाहिजे. अर्थात हे शिबीर आयोजित केल्याबद्दल लायनेस क्लब व लायन्स क्लब ऑफ अलिबाग, रायगड मेडिकल असोसिएशनचेही करावे तेवढे कौतुक थोडे आहे.
प्रयास हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वत: जावून सेवेची शर्थ पाहिली. डॉ. नितीन मोकल, डॉ. रवींद्र म्हात्रे यांच्यासह प्लास्टिक सर्जन डॉ. सागर गुंडवार, डॉ. निहार पटेल, डॉ. नयन, डॉ. महिनूर देसाई, डॉ. भरत सक्सेना, जनरल सर्जन डॉ. तिवारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. रेखा म्हात्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. संजीव शेटकार या व प्रयासचे सर्व सहकारी यांनी भगिरथ प्रयत्न करुन दोन दिवसात ५० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची अभावाने पहायला मिळणारी किमया केली. ध्यासाशिवाय असे प्रकल्प पूर्ण होत नाहीत. व्यंग असलेल्या १२० बाह्यरुग्णांमधून शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशा ५२ जणांची शुक्रवारी निवड करुन शनिवारी ३७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यानंतर रविवारी १५ जणावंर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया गुंतागुतीच्या. जन्मजात व्यंग आणि भाजल्यामुळे आलेले व्यंग या प्रकारातील सारे रुग्ण. दुभंगलेले ओठ व टाळू, भाजल्याचे व्रण व जखमा, आकसलेले स्नायू, बाह्य शरीरावरील गाठी, जन्मतःच असलेले व्यंग किंवा अपघाताने अथवा भाजल्याने आलेले व्यंग अशा प्रकारचे हे रुग्ण होते. डॉक्टरांसमोर आव्हान मोठे होते आणि रुग्णांच्या परिवाराच्या अपेक्षाही मोठ्या होत्या. या अपेक्षांचे ओझे न मानता डॉक्टरांच्या पथकाने ५२ जणांवर शस्त्रक्रिया केल्या. ३ ते ५० वयोगटातील अंगावर व्यंग बाळगत आलेली बालके, मुले-मुली, महिला, पुरुष यांची व्यंग या शस्त्रक्रियेने दूर करण्यात आल्याने त्यांच्यावरील व्यंगाचं ओझं उतरलं आहे. या प्लास्टिक सर्जरीचा फायदा आमच्या एका कलाकार मित्राने, किहीमच्या योगेश पवार यांनी घेतला. त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचे, शौर्यचे नाक जन्मापासून दोन्ही बाजूने फाटलेले होते. या नाकावर तीन टप्प्यात सर्जरी होणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया २१ मे रोजी झाली. त्यामुळे योगेश पवार खुष आहेत, त्याने आमच्याजवळ भावना व्यक्त करताना म्हटले की, माझ्यासारखा नोकरी करणारा, तसेच कलाकार म्हणून वावरणारा बाप अशा संकटात त्याच्या सर्जरीसाठी पैसा उभा करु शकत नव्हता. अशा परिस्थितीत डॉ. नितीन मोकल, डॉ. रवींद्र म्हात्रे आणि लायन्स क्लब यांनी आयोजित केलेले हे शिबीर माझ्यासाठी मोलाचे ठरले आहे. प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि रुग्णांनीही हीच भावना व्यक्त केली. हे शिबीर खरोखरच अनेकांसाठी आधार ठरले आहे.
रायगड जिल्ह्यात अशाप्रकारचे पहिले मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्याचा मान रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाला जातो. ऑगस्टमध्ये धोकवडे येथे शंकरराव म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीपंतपाडव्याचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त धोकवडे-सासवणे विभागातील ११ केंद्रशाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतात. १९९४ साली अशाच समारंभात स्व. प्रभाकर पाटील तथा भाऊंच्या हस्ते बक्षीस वितरण होत असताना प्रमिला धनाजी म्हात्रे या विद्यार्थिनीला बक्षीस देत असताना तिचा ओठ फाटला असल्याचे व त्यामुळे वैगुण्य असल्याचे भाऊंच्या लक्षात आले व त्यांनी त्याचवेळी, मी या मुलीच्या प्लॅस्टिक सर्जरीची व्यवस्था करुन तिचे वैगुण्य दूर करीन असे जाहीर केले. त्यानंतर प्लास्टिक सर्जन डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी अलिबाग येथील रामनारायण पत्रकार भवनात प्लास्टिक सर्जरीचे शिबीर आयोजित केले व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने तिची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. तसेच तिच्यासोबत जिल्ह्यातील शारीरिक व्यंग असलेल्या इतर २१ मुलां-मुलींचीही प्लॅस्टिक सर्जरी करुन त्यांना दिलासा दिला. त्यावेळी आजच्यासारख्या वैद्यकीय सोयीसुविधा नसतानाही अशाप्रकारचे प्लास्टिक सर्जरी शिबीर आयोजित करणे एक धाडसच होते. पण हे धाडस केले गेल्यामुळेच त्यावेळी जिल्ह्यातील शारीरिक व्यंग असलेल्या २२ मुला-मुलींच्या जीवनाला आकार आला. या प्लास्टिक शिबिराच्या यशानंतर जिल्ह्यात सामाजिक संघटना, तसेच वैद्यकीय संघटना व शासनस्तरावर अशी शिबिरे आयोजित करण्यात येवू लागली. याचा अर्थ अशा बाबींची कुठेतरी सुरुवात करणे आवश्यक असते. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आणि तोच सामाजिक सेवेचा वारसा कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल, अलिबाग लायन्स क्लब व रायगड मेडिकल असोसिएशनने आयोजित केलेल्या प्लास्टिक सर्जरी शिबिरातून दिसून आला.
या शिबिराच्या आयोजनाने प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल, प्रयास हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र म्हात्रे, अलिबाग लायन्स क्लबचे झोन चेअरमन नितीन अधिकारी, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे, रायगड मेडिकल असोसिएशन, अलिबाग शाखेचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्याकडून रायगडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यापुढेही त्यांनी अशा शिबिरांचे आयोजन करुन रायगडकराचा विश्वास जिंकावा. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा