-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
संपूर्ण कोकण पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. आपल्या रायगड जिल्ह्यात तर पर्यटनाच्या खूप संधी आहेत. या जिल्ह्यात समुद्र पर्यटन, गडकिल्ले पर्यटन, जलदुर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, सामाजिक पर्यटन, विज्ञान पर्यटन असे वेगवेगळे पर्याय पर्यटकांसमोर उभे आहेत. अलिबाग तालुक्याला तर रेवस-मांडवा ते चौल-रेवदंडा पर्यंत समुद्राचा विलोभनीय चंद्रहार लाभला आहे आणि या चंद्रहारात येथील पौराणिक आणि ऐतिहासिक इतिहास दडला आहे. बलरामाची पत्नी रेवती ते सरखेल कान्होजी आंग्रे, असा समृद्ध इतिहास या तालुक्याला आहे. हा इतिहास इतपतच मर्यादित नाही. अशा या अलिबाग तालुक्यात किहीम येथे राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर मांडवा लायन्स क्लबने किहीम-मांडवा लायन्स फेस्टीवल २९ एप्रिल ते २ मे २०१६ दरम्यान जल्लोषात आयोजित केले होते, त्याविषयी-
या अलिबागने, तालुक्याने स्वातंत्र्य चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, बेळगाव-भालकीपर्यंत धडक मारुन अलिबागचं पाणी कसं पेटू शकतं ते दाखवलं आहे. अलिबागचा किल्ले कुलाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असल्यामुळे त्याच्या चिरेबंदी कोटाचा (तटबंदी) कणखरपणा येथल्या भूमीपुत्रांमध्ये पहायला मिळतो. शहाळ्याच्या करवंटीसारखा येथील भूमीपुत्र रांगडा असला तरी त्यातील पाण्यासारखा त्याच्यात गोडवा आहे आणि हाच गोडवा येथील पर्यटनासाठी पुरक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. येथे पर्यटनाच्या दृष्टीने बर्याच उणीवा आहेत. रस्ते, इतर सोयीसुविधांचा अभाव, यांना येथे येणार्या पर्यटकांना तोंड द्यावे लागते, ही बाब तेवढी शोभादायक नाही. अलिबागला पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे आणायचे असेल तर पर्यटन विकासाची पावले जिल्हा प्रशासन, अलिबाग नगरपालिका यांनी एकत्रितपणे उचलली पाहिजेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी, येथील आजी-माजी आमदारांनी पर्यटन विकासाच्या दृष्टींनी चालवलेल्या प्रयत्नांना अधिक चालना देऊन ‘अभावग्रस्त पर्यटन’ ही अलिबागची काहीशी असलेली ओळख पुसली पाहिजे. हे सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत पर्यटनवाढीसाठी, व्यावसायिक वाढीसाठी, तसेच बचतगटांच्या हितासाठी अलिबाग महोत्सव, खारेपाट महोत्सव, अलिबाग लायन्स फेस्टीवल मोठ्या प्रमाणात भरवले गेले. यावर्षी याच महिन्यात किहीम येथे राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर माडवा लायन्स क्लबने किहीम-मांडवा लायन्स फेस्टीवल २९ एप्रिल ते २ मे दरम्यान जल्लोषात आयोजित केले होते. तेथे चार दिवस उसळलेल्या गर्दीने परिसरातील जनतेचा, तसेच पर्यटकांचा या फेस्टीवलला मोठा प्रतिसाद लाभला हे दिसून आले.
या फेस्टीवलचे वेगळे महत्व आहे. तिनविराजवळील खारेपाट महोत्सव सोडल्यास भव्यदिव्यरितीने अलिबाग शहरातच हे महोत्सव झाले आहेत. तसेच छोट्या प्रमाणात कुरुळ, नागाव आदी गावांत गावपातळीवर महोत्सव झाले असले, त्यांची सुरुवात चांगली असली, तरी त्यांची व्याप्ती मर्यादित होती. ते महोत्सव कौतुकास पात्र असले तरी किहीम या छोट्याशा गावात फेस्टीवलचे भव्यदिव्य आयोजन करुन एक चांगला पायंडा पाडल्याबद्दल अलिबाग लायन्स क्लबचे झोन चेअरमन, तसेच या फेस्टीवलचे चेअरमन नितीन अधिकारी, मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष अमीष शिरगावकर, उपाध्यक्ष सुबोध राऊत, सदस्य मानसी चेऊलकर, त्यांच्या इतर सहकार्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.
मांडवा लायन्स क्लबने या फेस्टीवलमधून कलाकारांना, व्यावसायिकांना, पर्यटनव्यावसायिकांना पर्यटनवाढीसाठी व्यासपीठ मिळवून दिले असले तरी या फेस्टीवलमागचा त्यांचा हेतू खूप सुंदर आणि सामाजिक सेवेशी बांधील आहे. त्यांना मोतीबिंदू रायगड जिल्हातून हद्दपार करायचा आहे, त्यासाठी अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी चोंढी येथे चालली आहे. तसेच परहूरच्या आसपास एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याचे शिवधनुष्य मांडवा लायन्स क्लबच्या या शिलेदारांनी उचलले आहे. हार्टचा रुग्ण असो कि कॅन्सरचा त्याला बरेचदा मुंबईला पोहोचेपर्यंत पुन्हा रायगड पाहण्याची संधी मिळत नाही. हार्टचा रुग्ण मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच रस्त्यात निधन पावतो. ही परिस्थिती कोणावरही ओढवू नये अशी या लायन्सची भूमिका आहे. त्या भूमिकेला या फेस्टीवलच्या उत्पन्नाचं कवच द्यायचं आहे. मांडवा लायन्स क्लब अलिबाग गेली चार वर्षे ग्रामीण भागामध्ये विविध समाजोपयोगी कार्य करित आहे. मांडवा लायन्स क्लबने जे उपक्रम राबविले त्यामध्ये प्रामुख्याने मोङ्गत नेत्रतपासणी व मोङ्गत मोतीबिंदू शस्त्रक्रीया, रक्तदान, रक्ततपासणी शिबिरांचे आयोजन, मोङ्गत औषधोपचार, आदिवासींना मोङ्गत भाजी बियाणे वाटप, अनाजदान, स्वच्छता अभियान असे अनेकविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांनी ओळखल्या जाणार्या मांडवा लायन्स क्लबला किहीम-मांडवा फेस्टीवलमुळे पर्यटक आणि परिसरातील जनतेच्या मनात ही ओळख पुन्हा ठळक झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा