-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
रामनवमीला अयोध्येपासून देशातील कानाकोपर्यात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. आमच्या अलिबाग तालुक्यात पोयनाड येथे भव्यदिव्य रामजन्मोत्सव होतो, तसा तो यावर्षीही झाला. पण २०१३ पासून दोन वर्षे श्रीरामजन्मोत्सवाला गालबोट लागले होते ते अलिबागेतील रामनाथ येथे. रामनाथचे नाव ज्या आंग्रेकालिन श्रीराम मंदिरावरुन पडले त्या पुरातन मंदिरात दरवर्षी श्रीरामजन्मोत्सव जिल्हा पोलिस दलाच्या बँड वादनाच्या जल्लोषात व्हायचा. पण २०१३ च्या श्रीराम जन्मोत्सवासाठी पोलिस दलाचे बँड पथक आलेच नाही. त्यामुळे अनेक वर्षांची बँड वादनाची चांगली परंपरा खंडीत झाली. वाईट परंपरांचे खंडन झाले तर त्यात काही वावगे नाही. परंतु श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी बँड वादन केले जाणे ही काही वाईट परंपरा नाही. पोलिस बँड वाजला म्हणून श्रीराम जन्मोत्सव मोठा होतो असे नाही. पोलिस बँड वाजला नाही, तरी भाविकांच्या टाळ्यांच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव झालाच. तसा तो गेली दोन वर्षे साजरा झाला आणि ही बाब आम्ही लक्षात आणून दिल्यावर यंदाच्या (२०१६) रामनवमी उत्सवात अखेर पोलीस बँड वाजला.

वस्तुत: रामनाथचे श्रीराम मंदिर आणि जिल्हा पोलिस यांच्या यांच्यात एक वेगळे नाते आहे. रामनाथ येथील ३०० वर्षांपूर्वीच्या या श्रीराम मंदिराच्या परिसराला लागूनच जिल्हा पोलिस मुख्यालय आहे. या मंदिराच्या सात एकर जागेपैकी चार एकर जागा तत्कालिन श्रीरामजी देवस्थान विश्वस्त मंडळाने शासनाला पोलिस निवासस्थाने बांधण्यासाठी ६० वर्षांपूर्वी ९० वर्षांच्या कराराने वार्षिक ५०० रुपये नाममात्र भाड्याने दिली आहे. या जागेवर पोलिसांची निवासस्थाने आहेत, याचा अर्थ श्रीरामचंद्रांच्या आश्रयाला पोलिस आहेत. या आश्रयाची जाणीव म्हणून जिल्हा पोलिसांतर्ङ्गे पोलिस बँड पथकाकडून श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवात त्यांना मानवंदना दिली जायची. २०१३ च्या रामनवमीला ही क्षुल्लक सेवाही जिल्हा पोलिस प्रमुखांनी घडवू दिली नाही. मुंबईमध्ये तत्कालिन पोलिस आयुक्त सत्यपालसिंग यांनी पोलिस ठाण्यांतील देवप्रतिमांना गेटआऊट करण्याचा फतवा काढला, त्या फतव्याचा धुरळा जिल्हा पोलिस प्रमुखांच्या डोळ्यात उडाला, त्यामुळे रामनाथ मंदिराच्या पार्श्वभूमीकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नसावे. परंतु २०१६ मध्ये २ वर्षांच्या खंडानंतर रायगडचे विद्यमान पोलीस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक यांनी याकडे लक्ष देऊन रामजन्मोत्सवात हा पोलीस बँड सुरु केला तो आता दरवर्षी वाजेल अशी अपेक्षा करताना, त्यांचे धन्यवाद मानावेच लागतील.
रामनाथ येथील श्रीराम जन्मोत्सव व देखभाल तुटपुंजा उत्पन्नावर करावा लागतो. अर्थात ही परिस्थिती केवळ या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरांचीच नाही, तर गावोगावच्या देवस्थानांची आहे. देवस्थानांच्या जमिनी गायब झाल्या आहेत, गायब केल्या गेल्या आहे. त्यामुळे आधी श्रीमंत असलेल्या देवस्थानांना आपले उत्सव साजरे करायला स्वत:चे उत्पन्न नाही. लोकवर्गणीवर हे उत्सव कसेबसे साजरे केले जात आहेत. अशाप्रकारे खुद्द देवांचीही ङ्गसवणूक जनतेच्या पातळीवर होत आहे, त्यामुळे शासकीय पातळीवर रामनाथ येथे श्रीप्रभूरामचंद्रांची उपेक्षा झाल्यास नवल नाही. पोलिस निवासस्थानासाठी दिलेल्या चार एकर जमिनीच्या शासनाकडून दिल्या जाणार्या वार्षिक ५०० रुपये भाड्यात रामनाथचा श्रीराम जन्मोत्सव होऊ शकतो का? या जागेबाबतचा करार संपायला अजून तीस वर्षे बाकी आहेत. तेथे पोलिस निवासस्थाने आहेत, त्यामुळे तीस वर्षांनंतर ती जमीन श्रीराम देवस्थानच्या ताब्यात दिली जाणे अशक्य वाटते.
शासनाने हा करार वाढविला तरी वार्षिक भाडे वाढवून दिले जाईल, याची शाश्वती नाही. पोलिस आणि शासनाच्या कात्रीत श्रीराम मंदिराची सध्या घुसमट चालू आहे आणि ही घुसमत भविष्यातही संपेल असे वाटत नाही. सध्याच्या बाजारभावाने ४० लाख रुपये गुंठा असलेल्या या देवस्थानाची चार एकर जागा आजही वार्षिक ५०० रुपये भाड्याने वापरली जाणे आणि श्रीरामजन्मोत्सवासाठी पोलिस प्रमुखांनी तीन मिनिटेही बँड पथकाची सेवा न देणे, ही एकप्रकारची चेष्टाच आहे. श्रीराम देवस्थानची जमीन शासनाने पोलिस निवासस्थानासाठी घेणे हा सारा प्रकार कायदेशीर आहे. ९० वर्षांच्या कराराचा बागुलबुवा उभा असल्यामुळे आजचे देवस्थानचे विश्वस्त हतबल आहे. तथापि, श्रीरामरायांच्या आश्रयास असलेल्या जिल्हा पोलिसांनी या रामजन्मोत्सवात आपला बँड वाजवून तीन वर्षांपूर्वी केलेली आपली चूक सुधारली असली तरी महाराष्ट्र शासनानेनीही पोलीस निवासस्थानाच्या जागेबाबत देवस्थानावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेऊन आपली चूक सुधारावी हीच अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा