-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
भारतात प्रत्येक वर्षी एक्यूट इन्सेफोलायटीस सिंड्रोमने शेकडो मुलांचे मृत्यू होतात. यावर उपाय असूनही हे मृत्यू रोखण्यात आपला देश पूर्णपणे अपयशी ठरला. आपल्या आरोग्य सेवा-सुविधांत गांभीर्याचा अभाव असल्यामुळेच असे घडत आहे. प्रश्न गरिबांच्या मुलांचा आहे, ते परदेशात उपचार घेऊ शकत नाहीत, ज्यांच्या हातात आरोग्य सेवेची सूत्रे आहेत, ते राजकारणी सरकारी पैशात परदेशात क्षुल्लकशा आजारावरही परदेशात उपचार घेतात. त्यांना सर्वसामान्यांचे काही पडले नसल्यामुळेच अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोग्य सेवांचा दुष्काळ आहे. परिणामी बिहारमधल्या मुजफ्फरमध्ये इन्सेफोलायटीस या जपानी मेंदूज्वराने लहानग्यांचे मृत्यूसत्र सुरु आहे. तेथे १५८ पेक्षा अधिक मुलांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, तर शेकडो मुलांवर अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या मेंदूज्वराला बिहारमध्ये चमकी ताप म्हणून ओळखले जाते. पण यावेळी लिचीला या आजाराचा स्रोत मानण्यात आले आहे. मुले अकाली मृत्यूमुखी पडत असूनही या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्याची गरज गेल्या काही वर्षांत का जाणवली नाही, याचे उत्तर मात्र मिळत नाही.
बिहारमध्ये एकीकडे मेंदूज्वराने थैमान घातले आहे, लहान मुले पटापट मरताहेत तर दुसरीकडे रणरणत्या उन्हानेही जीव जात आहेत. आतापर्यंत उष्माघाताने १८५ जणांचा मृत्यू झाला. या राज्यातील अनेक शहरांतील तापमान ४५ अंशांवर पोहोचल्याने प्रशासनाने आठवडाभर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मेंदूज्वरामुळे सुमारे १५८ पेक्षा अधिक मुले मृत्यूमुखी पडली आहेत. ही बहुतांश मुले गरीब घरची असून ती कुपोषणाच्या, उष्माघाताच्या विळख्यात सापडली होती. त्यामुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्तीच संपली होती. हीच परिस्थिती तेथे उपचार घेणार्या शेकडो बालरुग्णांची आहे. या मेंदूज्वराचा ठपका लिचीवर ठेवला जात असला तरी इन्सेङ्गोलायटीस आणि असह्य उन्हाळा यामुळे दोन्ही प्रकारच्या मृत्यूचे थैमान सुरु आहे हे लक्षात घेतले पाहिजे. लिची हा केवळ बहाणा आहे. इन्सेङ्गोलायटीस आणि उष्माघातापासून बचाव करण्यात उदासिनता दाखवली गेल्यामुळे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार बिहारमध्ये होत आहे. तेथे राज्यसरकार, तेथील आरोग्ययंत्रणा अपयशी ठरली आहे. देशात इतरत्र यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.
एक्यूट इन्सेङ्गोलायटीस सिंड्रोमचं पहिलं प्रकरण १८७१ ला जपानमध्ये आढळलं होतं. त्यामुळे त्याचं नाव जापनीज मेंदूज्वर असं पडलं. १९५५ मध्ये सर्वप्रथम तामिळनाडूमध्ये काही मुलांमध्ये इन्सेङ्गोलायटीसची लक्षणं आढळली होती. हा विषाणूजन्य ताप १९७३ मध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, आसामनंतर पाहता पाहता २२ राज्यांमध्ये पसरला. सरकारला याचे गांभीर्य २००५ मध्ये झालेल्या १४०० मृत्यूनंतर कळले. त्यानंतर २००६ मध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आसाममधल्या या तापाने सर्वाधिक ग्रस्त असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे आज बिहारला मोठी किंमत चुकवावी लागली आहे, असे म्हटले तर त्यात काही चुकीचे नाही.
एक्यूट इन्सेङ्गोलायटीस सिंड्रोम याचं मुख्य कारणं विषाणू मानले जाते. यातील काही विषाणूचे नाव हर्प्स व्हायरस, इंट्रोव्हायरस, वेस्ट नाइल, जपानी इन्सेङ्गोलायटीस, इस्टर्न इक्विन व्हायरस, टिक-बोर्न व्हायरस आहेत. एक्यूट इन्सेङ्गोलायटीस सिंड्रोम बॅक्टेरिया, ङ्गुंगी, परजीवी, रसायन, टॉक्सिनमुळे देखील पसरतो. भारतात एक्यूट इंसेङ्गलाइटिस सिंड्रोमचं मुख्य कारण जपानी विषाणू आहे. याव्यतिरिक्त निपाह आणि झिका विषाणू देखील इन्सेङ्गोलायटीसचं कारण असू शकतं. इन्सेङ्गोलायटीस शरीरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. मेंदूच्या पेशी आणि नसाना सूज आल्यास मेंदूचा ताप येतो. मेंदूतला ताप सांसर्गिक नाही. मात्र ताप पसरवणारा विषाणू संसर्गजन्य होण्याची शक्यता असते. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जोरदार ताप येतो. यानंतर शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, बेशुद्ध होणे, आकड्या येणे, भीती, कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबरदरम्यान बळावतो. तो विशेष करून १ ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलांना होतो. ताप येणे, डोके दुखणे, अशक्तपणा येणे, उलट्या होणे, भूक न लागणे, अतिसंवेदनशील होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजारातून रुग्ण वाचला तरी तो कोमा किंवा पॅरालिसीसचा बळी ठरतो, हा या तापाचा सर्वाधिक भीषण परिणाम आहे. यातून वाचलेला रुग्ण शांतपणे जीवन जगू शकत नाही, एवढा हा एक्यूट इन्सेङ्गोलायटीस सिंड्रोम घातक आहे.
जपानीज एन्सेङ्गेलायटीस हा आजार क्युलेक्स डासांमार्ङ्गत होणारा प्राणीजन्य रोग आहे. या प्रजातीमुळे मेंदूज्वर आणि हत्तीरोग होतो. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः ग्रामीण भागात आढळून येतो. मात्र शहरानजिकच्या वस्तीत/ झोपडपट्टीतसुद्धा या रोगाची साथ आढळून आली आहे. ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टीत पुष्कळ डुकरे आढळतात. या डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू मोठ्या प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही. या डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात, तेव्हा ९ ते १२ दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी मेंदूज्वर हा रोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुद्धा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळ्यासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात, तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्ङ्गत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काल ५ ते १५ दिवस असतो. या रोगाचे विषाणू रक्तात ङ्गार अल्पकाळ टिकत असल्याने या रोगाचा प्रसार माणसांमार्ङ्गत होत नाही. माणसाला झालेला जंतूसंसर्ग त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहून थांबतो. संपूर्ण जगात जापनीज इन्सेङ्गोलायटीसचे ६८ हजार प्रकरणं समोर आली आहेत, त्यातील १३ हजार ६०० ते २० हजार ४०० च्या आसपास मुले आणि मोठ्यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात किती लोक इन्सेङ्गोलायटीसने मृ्त्यूमुखी पडतात याची नीती आयोग आणि आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी दिलेली नाही.
चीन, कंबोडिया, ङ्गिलीपाईन्स, व्हिएतनाम, थायलंड, कोरिया, म्यानमार, श्रीलंका, बांग्लादेश, भारत, पाकिस्तान लाओस आदी देशांत इन्सेङ्गोलायटीसचा विषाणू मृ्त्यूचा दूत बनून येतो. भारत सोडून इतर देशांत इन्सेङ्गोलायटीस लस देण्याच्या कामात सरकारांनी गांभीर्य दाखवले आहे. लस देण्याच्या मोहिमेत आपण भारताची तुलना नेपाळशी केल्यास आपल्याला आपलीत लाज वाटेल, २००७ पर्यंत नेपाळचे २४ जिल्हे इन्सेङ्गोलायटीसग्रस्त होते. तेथील ७५ जिल्ह्यांतील मुलांना लस देण्याचं ९५ टक्के लक्ष २०१८ मध्येच पूर्ण झालं आहे. यासाठी नेपाळ आरोग्य विभागास चीनने लस पाठवून मदत केली आहे. १९७८ ते २०१२ दरम्यान नेपाळमध्ये इन्सेङ्गोलायटीसचे २९,८७७ रुग्ण रजिस्टर करण्यात आले होते, त्यातील ५५८९ रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणून नेपाळने इन्सेङ्गोलायटीस रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीनची मदत घेतली होती.
इन्सेङ्गोलायटीसला रोखण्यासाठी १९३० मध्ये जेई वॅक्स नावाची एक लस तयार करण्यात आली होती, त्याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली होती. ङ्ग्रान्सच्या लिओ शहरातील सानोङ्गी पास्टर नावाच्या कंपनीने याची मार्केटिंग सुरु केली होती. भारतात जेई वॅक्स सारखी लस बनवायला ८२ वर्ष लागली. २०१२ मध्ये ’जीव’ नावची लस बायोलॉजिकल इ लिमिटेड य ङ्गार्मा कपंनीने काढली. तिची किंमत ९८५ रुपये होती. ही लस केवळ एकदा घ्यायची होती, ती भारतात येणार्या पर्यटकांसाठी तयार करण्यात आली होती.
२०१३ मध्ये कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात भारत बायोटेक इंटरनॅशनलनेही लस विकसित करण्यात यश मिळविले. सर्व प्रकारचे प्रयोग केल्यानंत ती लस १ वर्षाच्या मुलापासून ५० वर्षाच्या प्रौढापर्यंत ९० टक्के सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. ही लस दोन वेळा द्यायची होती. पहिली ९ ते १२ महिन्यांदरम्यान आणि दुसरी १६ ते २४ महिन्यांदरम्यान डीपीटी-ओपीवी बरोबर द्यायची होती. परंतु गेल्या पाच-सात वर्षांत इन्सेङ्गोलायटीसचं एपीसेंटर बनलेल्या मुजफ्ङ्गरपूर, गोरखपूरपासून देशातील सर्वात इन्सेङ्गोलायटीसग्रस्त जिल्ह्यांत किती मुलांना ही लस दिली हा संशोधनाचा विषय आहे.
इन्सेङ्गोलायटीस अचानक दार ठोठावतो असं नाही. याच्या दुष्परिणामाखाली मुजफ्ङ्गरपूर, गोरखपूर आणि भारत-नेपाळचे सीमावर्ती भाग मोठ्याप्रमाणात आहेत तेथे जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने कमीत कमी ५०० इन्सेङ्गोलायटीसग्रस्तच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं मोठं हास्पिटल उभं करता येणार नाही काय? अशा हास्पिटलमध्ये संशोधनासह जगातील इतर ठिकाणांहून तज्ज्ञांना बोलविण्याची व्यवस्था व्हावी. तसेच देशातील सर्वच राज्यांच्या जिल्हा रुग्णालयांतील सेवा-सुविधा जीवंत करणे आवश्यक आहे. अगदी अलिबागसारख्या ठिकाणच्या सरकारी हॉस्पिटलसमोर इन्सेङ्गोलायटीससारखी बाब आली तर मृ्त्यूशिवाय पर्याय नाही. आरोग्यसेवा आणि ती देणारे कुशल डॉक्टर यांचा तेथे अभाव आहे. तेथील भ्रष्टाचार हाही रुग्णाला जगू देत नाही. अशी काहीसी परिस्थिती देशातील आरोग्य सेवांची आहे, त्यामुळे शेकडो बळी गेल्यानंतरही संबंधितांची गेंड्याची कातडी थरथरत नाही. एकीकडे आपण जगातली पाचवी आर्थिक महासत्ता होण्याची गोष्ट करतो, दुसरीकडे आपल्याला दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे वेध लागले आहेत. असे असताना देशाचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ती मुले इन्सेङ्गोलायटीसने पटापट माना टाकत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा