-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
वन्यजीव आणि वनस्पतींसमोर धोक्याची घंटा जगभरातील जैववैविध्याच्या संतुलनाचा कणा असलेल्या ७० हजार २९४ पैकी २० हजार ९३४ विविध पक्षी, प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, पर्यावरण संतुलनाला यामुळे मोठा धक्का बसणार आहे. भारतातील सात पक्षीप्रजाती जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. भारतात उभयचरांच्या १८ प्रजाती, माशांच्या १४, तर सस्तन प्राण्यांच्या १० प्रजाती दुर्मीळ होत आहेत. याला कारणे वेगवेगळी आहेत. अतिवृष्टी, अनावृष्टी, पूर, वादळे, प्रदूषण, शिकार, वणवे ही यामागे काही कारणे आहेत. या कारणांवर योग्य उपाययोजना झाल्यास, निदान मानवी हव्यासामुळे नाहीशा होणार्या पक्षी, प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती तरी काही प्रमाणात वाचू शकतील.
आपल्या देशात दर वर्षी हजारो वन्यप्राणी अकाली मृत्युमुखी पडतात आणि हीच परिस्थिती वनस्पतींचीही आहे. देशात दुर्मिळ वन्यजीव आणि दुर्मिळ वनस्पती आजपासून नाही, तर अनेक दशकांपूर्वींपासून नाहीसे होत आहेत. अशीच परिस्थिती साधारणपणे जगातील अधिकांश देशांमध्ये निर्माण झाली आहे, परंतु भारतात याबाबत अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येते. देशातील १० ते १५ राज्य दरवर्षी अतिवृष्टी, पूर आणि समुद्री वादळाची भीषणता झेलत असतात. आसाममधील राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्यालाही दरवर्षी पुराच्या प्रकोपाला तोंड द्यावे लागते. यामुळे शेकडो वन्यजीव आणि हजारो सरपटणारे जीव-जंतू पाण्यात वाहून मृत्यूमुखी पडतात.
केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदि दर वर्षी समुदी वादळ आणि पुराला सामोरे जातात. या कारणामुळे हजारो वृक्ष आणि वनस्पती उद्ध्वस्त होतात. या वृक्षांवर किंवा त्यांच्यामध्ये वावरणार्या वन्य जीवांची वादळादरम्यान कशी अवस्था होत असेल, याचा अंदाज सहजच बांधता येऊ शकतो. उत्तर प्रदेश आणि बिहारचे अनेक भाग पुरग्रस्त असतात. हीच परिस्थिती ओरिसाचीही आहे. याचबरोबर देशातील अनेक राज्यांना दुष्काळात होरपळून निघावे लागते. ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाअभावी धरतीचे तापमान वेगाने वाढत आहे. वन्यजीवांना वनांमध्ये खाण्यापिण्यास काही मिळत नाही. अशा परिस्थितीत ते आपला अधिवास सोडून अन्नपाण्याच्या शोधात अन्यत्र जातात आणि रस्ता चुकून ते गावांत, शहरांत घुसतात आणि लोकांच्या हातून अमानुषपणे मारले जातात.
याव्यतिरिक्त वन्यजीवांच्या अवयवांच्या (कातडे, हाडे, दात आणि इतर अवयव) तस्करीत आघाडीवर असलेले शिकारीही वन्यजीवांच्या प्राणाचे शत्रू बनले आहेत. केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षकांच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होत चालली आहे. हस्तिदंत, गेंड्याचे शिंग आणि वाघाच्या शरीरातील विविध अवयव यांच्या चोरटया व्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात या व्यापारातून दरवर्षी ३५ हजार ते ७० हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन्यजीवांच्या तस्करीमुळे कायदा आणि सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारी टोळ्यांचा निधी यांसारखे प्रश्न उपस्थित होण्याबरोबरच जंगलातील त्यांच्या अशा मुक्तसंचारामुळे जंगलात राहणार्या स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाण होऊ लागला आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत पकडलेल्या कुप्रसिद्ध वन्यजीव तस्कर संसार चंद्रने पोलिसांसमोर मान्य केलं होतं की त्याने एका वर्षात एकट्या राजस्थानच्या सरिस्का आणि रणथंभोर अभयारण्यात २० वाघांची हत्या केली आहे. संचार चंद्र जरी गजाआड गेला तरी अजूनही अनेक लहान-मोठे संसार चंद्र सक्रिय आहेत. त्यामुळे व इतर कारणांमुळे भारतातील सिंह, काळवीट, निलगिरी थर, स्नो लेपर्ड, बेंगाल वाघ, हत्ती, वन पिंगळा, चिंकारा असे अनेक वन्य जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यात जगातील वन्य जिवांच्या ६.५ टक्के वन्य जीव भारतात सापडतात. तसेच यातील अनेक जीव फक्त भारतातच सापडतात. अगदी महाराष्ट्रातील सर्वांना परिचित असणारा माळढोक पक्षी अगदी नष्ट होण्याच्या मार्गावर असून आता तरी ६०० पेक्षा जास्त पक्षी भारतात आढळत नाहीत ही बाब आपल्यासाठी धोकादायक आहे. यातील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे अधिवास नष्ट होत आहेत. माळढोक पक्ष्याला लागणारे गवताळ खुरट्या वनस्पती असणारी माळराने वन विभागाने वृक्षारोपण करून मूळ नैसर्गिक अधिवास नष्ट केले. शिवाय वणवे लागून अनेक ठिकाणची माळराने नष्ट होत गेली आणि कालांतराने ही माळराने फक्त खडकाळ स्वरूपाची होत गेली. शिवाय हा माळढोक साधारणपणे विकासाच्या आड येण्याच्या भीतीने बर्याच ठिकाणी स्थानिकांनी नष्ट केल्याचे दिसून येते.
उन्हाळ्यात जंगलांना वणवा लागण्याचे सत्र दीर्घकाळापासून चालूच आहे. ही आग लागते की लावली जाते, हे कधी उघड होत नाही. पण ही आग लागण्याची वेगवेगळी कारणे आहेत. जंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ असल्याने त्यावर कोणत्याही कारणाने ठिणगी पडल्यास जंगलाला आग (वणवा) लागते. पण जंगलात क्वचितच नैसर्गिक कारणांमुळे आगी लागतात. जंगल क्षेत्रातील ज्वालामुखी, वादळ, पाण्याच्या थेंबातून जाणारे सूर्यकिरण तसेच वीज पडल्याने लागणारी आग ही सर्व वणव्याची नैसर्गिक कारणे आहेत. तर अनैसर्गिक कारणांमध्ये गवताच्या वाढीसाठी, अकाष्ठ वनोपज गोळा करण्यासाठी, शेती करण्यासाठी, वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी, वन गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी जंगलाला आग लावली जाते. तसेच राब जाळतांना योग्य दक्षता न घेतल्याने आग जंगलात पसरते. वन्यप्राण्याना हाकलून लावताना आगी लावल्या जातात. अशी आग नंतर जंगलात पसरते. जंगलातील रस्त्याने माणसे जातांना जळती विडी, सिगारेट न विझवता तशीच जंगलात टाकतात किंवा माचिसची जळती काडी निष्काळजीपणे फेकतात. त्यामुळे जंगलाला आग लागते. जंगलात स्वयंपाक करताना विस्तव विझवण्याची दक्षता घेतली जात नाहीत आणि जंगलाला आग लागते. तर कधी हाय टेन्शन विजेच्या तारांमधून पडणार्या ठिणग्यांमुळेही जंगलाला आग लागते. याबरोबरच जंगलात वणवा लागण्यामागे कोळसा आणि लाकूड माफिया टोळ्यांचा हात असतो, हे काही लपून राहिलेले नाही.
जंगलात वणवा लावण्याचे कृत्य कोणाचेही असू दे, परंतु या वनक्षेत्रातं किती पशु-पक्षी आणि सरपटणारे जीव-जंतू प्रवास करतात आणि आग लागल्याने किती जीव जळून नष्ट होतात, किती दुर्णिळ वनस्पती नष्ट होतात, याचा कोणी अंदाज बांधू शकत नाही. भारतात वेगाने वाढणार्या लोकसंख्येमुळे लाकडाचा खप प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढला आहे. जन्माचा पाळणा असो कि मृत्यूची चिता असो लाकडे लागतातच. परदेशात निर्यात होणार्या हॅडिक्राफ्टच्या साहित्यासाठीही लाकडाची गरज वाढली आहे. याव्यतिरिक्त इमारती आणि जळावू लाकडाचाही खप वाढला आहे. या कारणांनी वनक्षेत्र वेगाने कमी होत आहे. वनक्षेत्रात किती आरा मशीने विनापरवाना चालवली जातात याची योग्य माहिती वनविभागाकडेही नाही. अधून मधून वनअधिकारी या बेकायदेशीर आरा मशीन्सविरुद्ध छाप्याची कारवाई करतात, तेवा काही बेकायदेशी आरा मशीन्स जरु पकडल्या जातात. ही वेगळी गोष्ट आहे की हातमिळवणीशिवाय वनक्षेत्रात बेकायदेशीर आरा मशीन्स वापरणे सर्वसामान्य माणसासाठी अनाकलनीय आहे. वन्यक्षेत्रातील माणसांचा हा अनावश्यक हस्तक्षेप वन्यजीवांचे जगणे अवघड अवघड करीत आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. लाकडाच्या लालसेने अंध झालेले काही व्यापारी दुर्मिळ वनस्पती वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असतील का? अशाप्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होतात, त्याचे उत्तर कोणाकडेही नाही.
दुर्मिळ आणि सुंदर वन्यजीव आपला नैसर्गिक वारसा आहे. त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने वन्यजीव अभयारण्य बनवली आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत अब्जावधी रुपयांचा खर्च झाला आहे, पण या अभयारण्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपययोजना अजूनही करण्यात आलेल्या नाहीत. याच कारणामुळे शिकारीच्या अधिकांश घटना वन्यजीव अभयारण्यातच घडल्या आहेत आणि घडतात. वनखात्यात कर्मचारी आणि अधिकार्यांची कमतरता असल्याचेही बोलले जाते. तसेच शिकार्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे वाहन, शस्त्रे इत्यादी पुरेशी साधने नसल्याच्याही तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींच्या जाती नष्ट होण्यापासून कसं रोखता येईल, हा प्रश्नच आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्रांचे व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीव व वन्यप्राण्यांना राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती करुन विशेष संरक्षण देता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत तरतुदी आहे. जैवविविधता जनन अधिनियम २००२ यासह क्रिमिनल प्रोसिजर कोड आदी कायदे सुद्धा अस्तित्वात आहेत. वन्यजीव व वनस्पती आदींच्या संरक्षणाबाबत असे मजबूत कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. तसेच वनखात्याच्या समस्याही सोडवणे अतिशय आवश्यक आहे. तसे केल्यास निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळतील. सरकारने तेवढे मनावर घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा