-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉
पेझारी हे गाव दोन मोठ्या पंत-संतांसाठी प्रसिद्ध आहे. एक राजकारणातील पंत तर दुसरे अध्यात्मातील संत. होय, शेकापचा लाल बावटा जिल्ह्यात फडकत ठेवणारे प्रभाकर नारायण पाटील आणि अवधूत संप्रदायाचा प्रेमध्वज फडकवणारे गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या बाबतचेच हे वर्णन आहे. पेझारी या गावात गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांनी साबाजीदादा शेडगे यांच्या आशीर्वादाने १९५८ मध्ये श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत संप्रदायाचे रोपटे लावले. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्यांचे पुत्र दिगंबर राणे अवधूत संप्रदायाचा झेंडा खांद्यावर घेऊन अध्यात्मातून समाजकारण करत आहेत.
गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांचा पुण्यतिथी उत्सव बुधवार, ८ एप्रिल २०१५ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र दिगंबर राणे यांच्या कार्याचा एक आढावा घ्यावासा वाटतो. तीन बहिणींनंतर दिगंबर राणे राणे यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९५९ ला झाला. त्याचे औचित्य साधून त्याच वर्षी गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांनी श्रीपंत भक्त मंडळ, पेझारीची स्थापना केली तर १९७४ ला श्रीदत्त मंदिराची बांधणी केली. त्यांनी १९८२ पर्यंत संप्रदाय चालवला, चांगला वाढवला.
चैत्र संकष्टी, ११ एप्रिल १९८२ रोजी त्यांनी देह ठेवला. अकरा महिन्यांनी त्यांच्या पत्नी सुनंदाताई राणे यांनीही देह ठेवला. त्यानंतर अवधूत संप्रदायाची धुरा त्यांचे पुत्र दिगंबर राणे यांच्याकडे आली.
गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांचे पुत्र दिगंबर राणे वडिलांसारखेच प्रेमळ, निगर्वी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आहेच. जन्मापासूनच अवधूत कार्याचे बाळकडू मिळालेल्या दिगंबर राणे यांनी आपल्या सहकारी गुरुबंधूंना घेऊन अनेक उपक्रम सुरु केले. स्वच्छता शिबीर, रक्तदान शिबीर. आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा तसेच विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवणार्यांचा सत्कार, हुशार व होतकरु विद्यार्थ्यांचा सत्कार, दहावीच्या विद्यार्थांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबीर असे अनेक उपक्रम श्रीपंत भक्त मंडळातर्फे वर्षभर राबविले जातात.
गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या पुण्यतिथीला श्रींच्या मूर्तीस अभिषेक, भजन इत्यादी कार्यक्रमासह गुणवंत विद्यार्थी व खेळाडू, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा कौतुक सोहळ्या बरोबरच या दिवशी सामाजिक सेवा करणार्या मंडळाला किंवा व्यक्तीला गुरुवर्य सुभानराव राणे पुरस्कार दिला जातो.
गुरुवर्य साबाजीदादा शेडगे पुण्यतिथी उत्सवप्रसंगी मान्यवरांचे परिसंवाद, विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप इत्यादी कार्यक्रम होतात. श्रावण वद्य अष्टमीला श्रीपंत जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुनंदाताई राणे पुण्यतिथीला इतर धार्मिक कार्याबरोबरच महिला मंडळाच्या विविध स्पर्धा घेतल्या जावून श्रीपंत वाङ्मयावरील प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम होतो. श्रीदत्त जयंतीचा कार्यक्रम तीन दिवस साजरा होतो. हे सर्व कार्यक्रम दिगंबर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धरित्या शिस्तबद्धपणे पार पडतात. या त्यांच्या अवधूत कार्यात त्यांच्या पत्नी सौ. दिप्ती राणे यांची खंबीर साथ आहे. त्याचा हा अध्यात्माचा वारसा त्यांचा पुत्र व विवाहित कन्या यांनीही प्रगल्भतेने चालवला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा