-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉
अलिबागकरांना विलास समेळ माहीत आहेत ते चोंढीचे एक उद्योजक, कवी म्हणून. वृत्तपत्र विक्री, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, गिफ्टशॉप, अशा सर्व क्षेत्रात त्यांनी झोकून काम केले. मात्र चोंढीहून निवृत्तीचे जिणे जगण्यासाठी ते घणसोलीत गेले आणि त्यांना नवी ओळख मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या छंदातून निर्माण झालेल्या कलेने ते ओळखले जावू लागले आहेत.
१३,१४,१५ मार्च असे तीन दिवस अलिबागेतील सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या पाठिमागील भागात महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाने भरवलेल्या प्रदर्शन व विक्री महोत्सवात विलास समेळ यांच्या पर्यावरण पुरक पेपर बॅग्जचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्या पेपर बॅग्जवरील त्यांच्या हस्ताक्षरातील सुविचार, कविता वाचन संस्कृतीला उत्तेजन देणार्या होत्या, याबरोबरच वाढदिवस, विवाह, इतर विविध समारंभात देता येण्याजोगी त्यांनी बनविलेली ग्रिटीेग्ज, प्रेझेंट पॉकिटस्, तसेच पोस्टकार्डवरील लिखाण ह्रदयाला हात घालणारे असल्यामुळे या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होणे साहजिकच होते. तथापि विलास समेळ यांचा यामागे पैसा मिळवणे हा उद्देश नाही, आपले छंद जोपासणे हा त्यांचा उद्देश आहे.
आपल्या वयाच्या साठीनंतर निवृत्तीचे जीवन छंदांमध्ये ‘आनंद द्या, आनंद घ्या’ या पद्धतीने जगत आपण वाचलेले मराठी सुविचार, लेखन लोकांपर्यत पोहोचवावे या हेतूने त्यांनी आपले पोस्टकार्डवरील विविध प्रकारचे लिखाण, हस्ताक्षर, हस्ताक्षरातील कविता, कॅलिग्राफी याचे पहिले प्रदर्शन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या सभागृहात भरविले होते. त्यानंतर अलिबागेतील राममंदिरात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनानंतर ९ ते १६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सिडको हॉल, नवी मुंबईतील कोकणसरस महोत्सवात त्यांच्या कलाकृती असलेल्या सुनीता आमले यांच्या नव निर्मिती बचत गट-चोंढीच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला दुसरा क्रमांक मिळाला. यामुळे त्यांचा उत्साह अधिक दुणावला आणि त्यांनी ठाणे येथील ‘ती’ महोत्सवात सहभाग घेतला. शिवाजी मैदान, जांभळी नाका, नौपाडा, ठाणे येथील ६ मार्च ते ९ मार्च २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’ महोत्सवात ८० स्टॉलमधून त्यांच्या नव निर्मिती बचत गट-चोंढीची उत्कृष्ट सजावट, मांडणी आणि पर्यावरण पुरक वस्तूंची विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांक म्हणून निवड झाली.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे, हे पाहूनच त्यानी पर्यावरण पुरक पेपर बॅग्जची निर्मिती करणे सुरु केले आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या ‘पर्यावरणाचा टळेल र्हास, सोडता प्लास्टिकचा हव्यास, यावर आता एकच उपाय, पेपर बॅग हाच पर्याय’ या स्लोगनचाही ते मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यांचे सुलेखन असलेल्या एक हजारांहून अधिक पेपर बॅग्जची आतापर्यंत विक्री झाली आहे, यातून समाजात पर्यावरण विषयक जागृती वाढत आहे हे लक्षात येते. याबरोबरच विविध प्रकारचे लेखन असलेली पोस्टकार्ड, ग्रिटींग्ज यांचीही विक्री दोन हजारांहून अधिक झाली आहे.
विलास समेळ यांना वृत्तपत्र वाचनाबरोबर कथा, कादंबर्या वाचनाचाही नाद आहे. त्यांचे स्वत:चे घरात वाचनालय असून त्यात सुमारे १२०० पुस्तके असून ती त्यांनी वाचलेली आहेत. १९९० पासूनचे अनेक दिवाळी अंक त्यांच्या संग्रही आहेत. आवडलेल्या विषयांवरील वृत्तपत्र कात्रणे त्यांच्या संग्रही असून स्वत:सह नामवंत कवींच्या सुमारे तीन हजार कविता त्यांनी स्वत:च्या सुंदर अक्षरात लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या छंदाला त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा समेळ, तसेच मुले परेश व मृगेश, सुना सुरभी व माधुरी यांचे उत्तेजन असल्यामुळे आज वयाच्या ६३ व्या वर्षातही आपले जीवन मनस्वीपणे जगत आहेत. विलास समेळ यांचा मो. ८८७९००५८५८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा