-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
काय जमाना आहे हा? लोकांचं पोलिसांच्या पोटाकडे लक्ष असते, इतकेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या पोलिसांच्या पोटाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. मुळात सुशीलकुमार शिंदे हे एकेकाळी स्वत: पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांनी नुकतेच आपल्याला पोट वाढलेले पोलिस अजिबात पसंत नाहीत, असे सांगितले. पण सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारण्यांच्या पोटाबद्दल काही नाराजी व्यक्त केली नाही. तसे सर्वांचेच राजकारण्यांच्या पोटाकडे दुर्लक्ष असते. ते कितीही फुगलेले असले तरी त्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. उलट त्यांच्याबद्दल विश्वासच लोकांच्या मनात असतो. एखाद्या बुवा- महाराजांवर असावी तशी ही श्रद्धा चिवट असते, त्यामुळे या राजकारण्यांनी कितीही पक्षांतरे केली, तरी जनता त्यांना अंतर देत नाही. नेत्यापाठोपाठ मुकाट जाण्यात तिला धन्य वाटते.
हीच जनता नंतर गृहित धरली जाते आणि एकदा जनता गृहित धरली गेली की, तिच्या हाती आश्वासनांशिवाय काहीही उरत नाही. नेत्यांची पोटे फुगत जातात, नशिबाने ती फुटत नाहीत आणि फुटली तर त्यातून काय बाहेर पडेल हे सांगता येणार नाही. नेत्यांवर त्यांच्या समर्थक जनतेचा इतका विश्वास असतो, परंतु पोलिसांचे समर्थक नसल्यामुळे त्यांची फुगलेली पोटे नजरेस भरतात. या पोटांकडे अविश्वासाने पाहिले जाते. या पोटांत काय दडले आहे, याचा अंदाज घेतला जातो. लोकांनी पोलिसांना टार्गेट ठरविले असले, तरी विनोदी लेखकांचे टार्गेट तुंदीलतनू राजकारणीच राहिले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी वारंवार लिहिले आहे की, नेतागण किती सिमेंट खातात, किती चारा खातात; पण कधी ढेकरही देत नाहीत. याचा अर्थ, ते सतत अतृप्तच असतात. एक मात्र खरे आहे की, नेत्यांच्या पोटावरील या भाष्याला राजकारण्यांच्या आताच्या पिढीने खूपच गांभीर्याने घेतले आहे. आजकाल सर्वांनी जीम जॉईन केली आहे अथवा एखाद्या योगगुरुला शरण गेले आहेत.
यात त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, आपले पंतप्रधान आणि दुसरे भावी पंतप्रधान सपाट पोटवाले आहेत. याचा अर्थ, पोटाबाबत आता खूपच जागृती झाली आहे. त्यामुळे पुढे सगळेच राजकारणी, नेते सपाट पोटांचे दिसले तर नवल नाही. पण, प्रश्न असा आहे की, सपाट पोटे होऊन भ्रष्टाचार, घोटाळे थांबणार आहेत काय? हे पोटपुराण इतपतच मर्यादित नाही. पुरुषांचे पोट परमनंट ङ्गुगते. महिलांचे पोट अल्पकाळासाठी फुगू शकते. भारताच्या बहुसंख्य लोकसंख्येचे पोट आणि गाल दोन्ही पिचलेले आहेत. त्यांच्या पोटातील वेदनेचं कारण आहारातील गडबड नाही, तर भूक, कुपोषण आहे.
लोकसंख्येच्या एका लहानशा भागाला पोट वाढविण्याची सुविधा आहे. त्यांना खाण्यासाठी मेवा-मिठाई, चिकन- बिर्याणी, तूप-लोणी सहजपणे उपलब्ध आहे. या लठ्ठांमुळे योगगुरु, जिमगुरु, डाएटेशियन, सडपातळ करणारं तेल, औषध आणि चहा विकणार्यांची दुकाने धूमधडाक्यात चालतात. टीव्हीवर जाहिरातदार सांगतात की, तुमच्या पोटावर चरबीचे थराच्या थर चढले आहेत.
वय वाढण्याबरोबरच चरबी जमा होणे साहजिकच आहे. चरबीचा हा अभेद्य दुर्ग भेदणे कठीण आहे. मग आपण जीममध्ये जाऊन घाम गाळा, नाहीतर वेगाने धावा किंवा कपालभाती करा, पोट सपाट होणार नाही. आमचं जादूई तेल किंवा करामती चहाच आपल्याला या लठ्ठपणापासून मुक्ती देऊ शकेल. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युवराज गांधी यांचं स्लिम राहण्याचं रहस्य आहे, तेच जाणोत, परंतु हे मात्र खरे आहे की, विवाहापूर्वी अधिकांश पुरुष काडी पेहेलवान असतात. पत्नीचं प्रेम आणि तिच्या हातचं अन्न त्याला ढेरपोट्या बनवतं. या जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठं दुसरं काही नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आईचे प्रेम आणि तिच्या हातचं अन्न ज्याला ढेरपोट्या बनवू शकत नाही, त्याला पत्नीच्या हातचं अन्न कसं ढेरपोट्या बनवतं? वयाच्या तीस-बत्तीसाव्या वर्षी जन्म घेणारी ही तुंदीलतनू व्यक्तीला अगदी स्मशानापर्यंत साथ देते. मैत्री, संबंध जरी सुटले तरी हा लठ्ठपणा साथ सोडत नाही. जितका लठ्ठपणावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तितका लठ्ठपणा वाढतोच, अशी लठ्ठपणाची ख्याती आहे. त्यामुळे लठ्ठ माणसाला लठ्ठपणासारखा सोबती नाही असे म्हटले तर लठ्ठ माणूस आणि लठ्ठपणा यांचा गौरव केल्यासारखेच आहे. ढेरपोटाबाबत अधिक तणावग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. लठ्ठपणा असेल तर हार्ट ऍटॅक येईल, मधुमेह होईल. हे होईल ते होईल, असा तणाव मनात निर्माण करु नये.
जितका तणाव बाळगला जाईल, तितकाच अधिक आहार केला जातो. अतिरिक्त आहार आणि ङ्गुगलेले पोट. ङ्गुगलेले पोट इतकी वाईट गोष्ट नाही. पोलिसवाले जेव्हा गुन्हेगारांबाबत पुरावे शोधत असतात, तेव्हा वाहिन्यांवर दाखवले जाणारे त्यांचे पोट किती सुंदर दिसते. त्यासमोर बिकीनीवालीचं सौंदर्यही ङ्गिकं पडतं. ढेरपोट्या माणूस जेव्हा हसतो, तेव्हा त्याचे हिंदकळणारे पोट पाहून उदास, निराश व्यक्तीही हसण्याची उबळ दाबू शकत नाही. त्याची नाराजी, निराशा छु-मंतर होते. त्यामुळे पोट नाही त्यांनी कुत्सिक हसायचं नाही आणि पोट आहे त्यांनी रुसायचं नाही. ज्यांनी त्यांनी आपापली पोटं सांभाळावी, तेच बरे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा