-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
मुंबईतील मोक्का न्यायालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अफजल उस्मानी हा समुद्रमार्गे ‘युसुफ दरबारी’ या बोटीने रायगडच्या दिशेने पळाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तो अलिबाग किंवा जिल्ह्यातील इतर समुद्रकिनारी उतरल्याच्या शक्यतेने रायगड पोलिस सक्रिय होणे साहजिकच आहे. अफजल उस्मानी रायगड जिल्ह्याच्या आश्रयास आला असेल तर ते रायगड पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे आणि रायगडच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारे आहे. गुन्हेगारीबरोबर रायगड जिल्हा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान ठरला तर बॉम्बस्फोटांचा धोका आपल्या उंबरठ्यापर्यंत आला आहे हे नक्की. मुंबई जवळ असण्याचे फायदे मिळण्यापेक्षा असे तोटे भविष्यात रायगड जिल्ह्याला सहन करावे लागणार आहेत.
रायगड जिल्हा हा मुंबईच्या जवळचा जिल्हा असला तरी विकासापासून खूप लांब आहे. मग तो राजकीय विकास असो, सामाजिक-सांस्कृतिक विकास असो, शैक्षणिक विकास असो, येथील माणसांना मुंबई-पुण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र येथील गुन्हेगारीचा मात्र मुंबईच्या बरोबरीने विकास झाला आहे. हा विकासही येथे मुंबईतूनच झिरपला आहे. मुंबईचे प्रतिबिंब येथे पाडण्याच्या नादात तेथील भौतिकता आणि लैगिंकता हाच आदर्श एक वर्ग बाळगू लागला, त्यामुळे या जिल्ह्यात बलात्कार, अपहरण, खंडणी, घरफोड्या इत्यादी प्रकारांत वाढ झाली. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली. अगदी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरही मुंबईमार्गे रायगड जिल्ह्यात घुसले आणि येथे गुन्हेगारीचे एक युग अवतरले. येथील सामान्य नागरिकाला रेशनकार्ड, मतदार यादीत नाव समाविष्ट करताना दमछाक होते, परंतु या घुसखोरांची नावे मात्र अलगद या याद्यांत जातात, त्यांच्या येथे वस्त्याही उभ्या राहतात. सर्व राजकारण्यांच्या कृपेने होत असते. अनधिकृत झोपडपट्ट्यांचे लोण जिल्ह्यात पसरले आहे, ते निव्वळ राजकारण्यांच्या कृपाप्रसादामुळे. सामान्य माणूस मात्र बँकाचे गृहकर्ज घेऊन आयुष्यभर फेडत राहतो आणि आपल्या मूळगावी घर असूनही येथे मात्र अनधिकृत झोपडी राजकारण्यांकडून आपल्या गळ्यात पाडून घेण्यात हे तथाकथित गरीब आघाडीवर असतात. या बकाल झोपड्यांतूनही गुन्हेगारी फोफावते आणि ते गुन्हेगारांचे आश्रयस्थान ठरते. विशेष म्हणजे या अनधिकृत वस्त्यांना वीज आणि पाणी पुरवण्याबाबत राजकीय नेते आंदोलने घडवत असतात. या झोपडपट्ट्यांत चाललेल्या कारवायांकडे मात्र ते लक्ष देत नाहीत, कारण ते त्यांचे मतदार असतात. त्यांची एकगठ्ठा मते राजकीय नेत्यांचे नशीब पालटवू शकतात. सत्तेच्या हव्यासापाई देशाशी द्रोह करण्याचीही कीडच समाजाला अस्वस्थ करीत आली आहे. यामुळेच अराजकाला स्थान मिळत आले आहे. ही गुन्हेगारीची केंद्रे अतिशय संवेदशील आहेत आणि याच केंद्रात उफजल उस्मानीसारखा इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी लपल्यास नवल वाटणार नाही. शुक्रवारी मुंबईतील मोक्का न्यायालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अफजल उस्मानी हा समुद्रमार्गे ‘युसुफ दरबारी’ या बोटीने रायगडच्या दिशेने पळाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तो अलिबाग किंवा जिल्ह्यातील इतर समुद्रकिनारी उतरल्याच्या शक्यतेने रायगड पोलिस सक्रिय होणे साहजिकच आहे. रायगड पोलिसांची सध्या अफजल उस्मानीला जेरबंद करण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व मार्गांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, लॉजेस यांची तपासणी केली जात आहे, परंतु अफजल उस्मानी काही हाती लागत नाही, त्यामुळे त्याचा फोटो असलेले पोस्टर जिल्हाभर लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये दाढीमिशी असलेला अफजल उस्मानी बिन दाढीमिशीचा लोकांसमोरुन गेल्यास त्याला ओळखता येणे अवघड आहे. तसेच तो समुद्रमार्गे गेला असल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा गोव्यालाही पोहोचू शकतो. सध्या दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून गोवा बदनाम होऊ लागला आहे. त्यामुळे गोव्याची ही बदनामी टाळण्यासाठी गोवा राज्य सरकार आणि गोवा पोलिसांना काटेकोर पावले उचलावी लागणार आहेत. असो, रायगड जिल्ह्यात अफजल उस्मानी कोठे लपू शकतो, याची जिल्हा पोलिसांना कल्पना असेलच, त्यामुळे त्यांनी हॉटेल्स, लॉजेस यांच्याबरोबर झोपडपट्ट्याही तपासल्या असतील, अशी आशा करायला हरकत नसावी. अर्थात अफजल उस्मानीचे पलायन हे पूर्वनियोजित होते, एवढे मात्र त्याच्या गायब होण्यावरुन लक्षात येते. मुळात तो पोलिसांच्या हातून सुटला कसा? तो कडेकोट बंदोबस्तातून पळाला कसा? हे कोडे आहे आणि याचे उत्तर पोलिस खातेच देऊ शकते. अफजल उस्मानी याने २००८ साली गुजरातमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका घडवून आणली होती. इंडियन मुजाहिदीनसाठी तो काम करीत होता. त्याच्या नावावर हत्या, खंडणी असे अनेक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो पोलिसांचा मोठा सोर्स ठरला होता आणि त्यामुळेच इंडियन मुजाहिदीनचं, भटकळ बंधूचं बिंग फुटू शकलं होतं. इंडियन मुजाहिदीनचं मोड्युल देशभरात उघडकीस आलं ते अफजल उस्मानीच्या अटकेनंतरच. उत्तर प्रदेशातील फिरोझपूर येथील अफजल उस्मानी याने आपली गुन्हेगारी, दहशतवादाची कारकीर्द यासिन भटकळ याच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरु केली. शिवाजीनगर गोवंडी येथे राहूनच त्यांनी देशविघातक कारवाया सुरु केल्या. त्याची अटक हा दहशतवादी साखळीला मोठा धक्का होता, पण या साखळीने अफजल उस्मानीला सोडवण्यात यश मिळवले आहे. पोलिस यंत्रणेला दिलेला हा शह पोलिसांच्या जिव्हारी लागणे साहजिकच आहे. पण आता केवळ त्याचा शोध घेणे हेच पोलिसांच्या हातात आहे आणि सध्या तेच चालू आहे. अफजल उस्मानी रायगड जिल्ह्याच्या आश्रयास आला असेल तर ते रायगड पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे आणि रायगडच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारे आहे. गुन्हेगारीबरोबर रायगड जिल्हा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान ठरला तर बॉम्बस्फोटांचा धोका आपल्या उंबरठ्यापर्यंत आला आहे हे नक्की. मुंबई जवळ असण्याचे फायदे मिळण्यापेक्षा असे तोटे भविष्यात रायगड जिल्ह्याला सहन करावे लागणार आहेत, हे निश्चित!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा