-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ आणि राज्य सरकारने डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न पडला आहे. राज्याची मराठी अस्मिता झोपा काढत असल्याचे हल्ली दिसत असले तरी अलिबागसारख्या छोट्या शहरातील पेशाने चाईड अकाऊंटंट असलेल्या संजय राऊत यांच्यासारखे जागरुक नागरिक भिंग हातात घेऊन शिक्षणक्रमाकडे पाहतात तेव्हा निश्चितच मराठी अस्मितेचा जागर जोमाने होतो. संजय राऊत यांनी गुरुवारी अलिबागेत जी पत्रकार परिषद घेतली, त्यातून त्यांनी महाराष्ट्रव्यापी प्रश्नाला हात घातला. हा प्रश्न शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राची निगडीत असल्यामुळे आणि मराठी भाषेच्या अवहेलनेचा असल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे जून २००९ पासून अनिवार्य केले आहे. शासनमान्य अभ्यासक्रमानुसार अमराठी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषेच्या अध्ययन अध्यापनासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने आतापर्यंत पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्र पुस्तिका व तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित स्वरुपाचे पाठ्यपुस्तक व चौथीसाठी ‘मराठी सुलभभारती’चे पुस्तक तयार केलेली आहेत. संजय राऊत यांनी कळीचा मुद्दा बनवलेल्या इयत्ता चौथीसाठीच्या सुलभभारती पुस्तकास महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग व मार्च २०१२ द्वारा मंजुरी मिळाली आहे. अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यात आलेल्याला तीन वर्षे उलटल्यानंतर ते पुस्तक प्रसिध्द झाले असून त्या पुस्तकात मराठीची अक्षरशः दयनीय अवस्था करण्यात आली आहे. मराठीत्तर माध्यमांतील विषयांची पुस्तके मराठीची किती आणि कशी राजवस्त्रे लेवून असतील, ती फाटकी असतील की तुटकी असतील याचा अंदाज चौथीच्या मराठी विषयांच्या पुस्तकातून येतो. हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, गुजराती, तेलगू व सिंधी या मराठीत्तर माध्यमांच्या मराठी विषयासाठी पहिली ते चौथीसाठी काढलेली पुस्तके मराठीची प्रतिष्ठा वाढविणारी आहेत, की धुळीत मिळवणारी आहेत, याचा विचार पाठ्यपुस्तक महामंडळातील पंडितांना करावासा वाटला नाही हे मराठीचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव म्हटले पाहिजे.
महाभारतातील अंध ध्रुतराष्ट्राला संजयाने महाभारत युध्दाच्या बातम्या सांगितल्या, तसेच अलिबागेतील संजयला अंध शिक्षण व्यस्थेतल्या त्रुटी सांगाव्या लागल्या आहेत. ‘सुलभभारती’ ही मराठीत्तर मराठी विषयांची पुस्तके हा सर्व अजबभारती वाटण्याजोगा सर्व प्रकार आहे. त्यातील मराठी शोधण्यासाठी शेरलॉक होम्स, नाहीतर करमचंदलाच बोलवायला हवे. मराठी विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना मराठी विषयांच्या पुस्तकातील मराठी शोधणे हे समुद्रातुन सुई काढण्यासारखे आहे. मराठी माणूस समुद्रात उडी मारुन रेती काढेलपण सुई काढू शकत नाही, त्यामुळे तो केवळ कंठशोष करु शकतो. पण त्यातील संजय राऊत यांच्यासारखी आकडेमोडीत व्यस्त असलेली माणसे मराठीसाठी झगडा प्रारंभ करतात, तेव्हा त्यांचे काम कौतुकास्पद वाटते. राज्याचे मुख्यमंत्री तर ‘सू’ची नदी करण्याइतपत पॉवरबाज मराठी व्यक्तिमत्व आहे. बहुसंख्य आमदार मराठी आहेत. दिल्लीला धाडलेले बहुसंख्य खासदार मराठी आहेत, तरी मराठीला धाड भरलेली आहे हे सर्व आक्रितच म्हणायला हवे आणि असे आक्रित उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात, केरळ इथे घडू शकत नाही, तर ते महाराष्ट्रातच घडू शकते. कारण ती राज्य भाषिक अस्मितेला प्राध्यान्य देतात आणि महाराष्ट्र मात्र मराठीच्या वस्त्रहरणाला प्राधान्य देते, त्यामुळे मराठी मायमाऊली आपले उघडे अंग झाकण्याच्या प्रयत्नात आहे आणि हे सर्व राजकीय पातळीवरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आमदार, खासदार, दिल्ली, महाराष्ट्रातील मराठी मंत्री खाली मान घालून उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा वेळी मायमराठीची अबू्र झाकण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला श्रीकृष्ण बनावे लागणार आहे याची जाणीव अलिबागच्या ‘संजय उवाच’मधून प्रकर्षाने झाली असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही.
काय संजय राऊत यांचे मागणे आहे? त्यांचे मागणे आहे इंग्रजी माध्यमासाठी चौथीसाठी चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या मराठीचे अवमूल्यन करुन समाविष्ट केलेले धडे व कविता वगळाव्या. मराठी सोडून इतर माध्यमांच्या शाळांना संपूर्ण महाराष्ट्रात एकच पुस्तक अनिवार्य करावे. खरोखरच इतकी माफक मागणी आहे आणि ती मान्य झाल्यास निश्चित मराठी भाषेची शैक्षणिक स्तरावर चाललेली घसरण थांबेल. चौथीच्या मराठीत्तर माध्यमांच्या मराठी विषयाच्या पुस्तकात मराठीचा लवलेश नसलेले धडे आहेत आणि मराठीचा संबंध नसलेल्या भाषेच्या अभ्यासाचे ओझे मराठीत्तर माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर ठेवून महाराष्ट्रातून शुध्द आणि सुलभ मराठी हद्दपार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. इतकेच नव्हे तर ही पुस्तके सर्व अमराठी माध्यमांचा शाळांना अनिवार्य असूनही महाराष्ट्रात बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या मर्जीप्रमाणे तिसरी व चौथीसाठी मराठी पुस्तके वापरत आहेत. बर्याचशा शाळा इयत्ता तिसरीसाठी मराठी माध्यमाकरिता असलेले इयत्ता पहिलीचे पुस्तक व इयत्ता चौथीसाठी मराठी माध्यमाकरिता असलेले इयत्ता दुसरीचे पुस्तक वापरत आहेत. म्हणजे याचा अर्थ चालू शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरु होऊन पंधरवडा झाला असूनही मराठीत्तर माध्यमांच्या शाळांनी कुठले मराठीचे पुस्तक वापरावे याचा सावळागोंधळ सुरु आहे. यावरुन एकाच इयत्तेत विद्यार्थ्याला महाराष्ट्रात समान शैक्षणिक स्तराचे शिक्षण मिळत नाही. तसेच मराठीशी फारकत घेणारे धडे व कविता या मराठीत्तर माध्यमाच्या मराठी विषयाच्या पुस्तकात आहेत, ते धडे, कविता अर्ंतभूत केले पाहिजेत व ही पुस्तके मराठीत्तर माध्यमाच्या सर्व शाळांना अनिर्वाय व बंधनकारक करणे आवश्यक आहे. मराठी माध्यमाच्या शाळांना एकीकडे गळती लागली असताना मराठीत्तर माध्यमाच्या शाळांतील मराठीलाही गळती लागू नये याची काळजी महाराष्ट्राने घेतली पाहिजे आणि यासाठी शिक्षणमंत्र्यांनी आपली कुंभकर्णी झोप मोडून वास्तवाच्या पायरीवर आले पाहिजे. पाठ्यपुस्तकांच्या क्षेत्रातील चालू असलेली चालूगिरी वेळीच लक्षात येत आहे, त्यामुळे या चालूगिरीवर वेळीच आवर घालण्यासाठी मराठी जनतेचा दबावगट करण्याची गरज आहे, अन्यथा एक दिवस आपलेच मराठी राज्यकर्ते, या महाराष्ट्राचे कर्नाटक किंवा उत्तरप्रदेश करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा