-उमाजी म. केळुसकर ⬑ चिंतन ⬉
पुस्तके ही किमयागार आहेत. या पुस्तकांना कोणी गुरु म्हणो, मित्र म्हणो वा मार्गदर्शक, एक मात्र खरे की ही पुस्तके म्हणजे माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकणारी एक महाशक्ती आहे, महासत्ता आहे आणि यातूनच जग नावाचे पुस्तक उघड होते. म्हणूनच पुस्तकांना आवर्जून किमयागार म्हणायला हवे. जागतिक पातळीवर पुस्तकांची वाचकांच्या जीवनात किमया करणे हीच भूमिका राहिली आहे. पुस्तक मग ते कोणत्या भाषेतील आहे, याला महत्व उरत नाही. उरतात ते त्यातील विचार आणि याच विचाराने माणूस घडत असतो. प्रगल्भ बनत असतो. त्याच्या जाणीवांचा विस्तार होत असतो. त्याला माणूस म्हणून जगण्यास उद्युक्त केले जाते. माणसांवर पुस्तके अशाप्रकारचा प्रभाव निर्माण करतात. जगातील यच्चयावत महान व्यक्तींवर पुस्तकांचा मोठा परिणाम राहिला आहे. या परिणामांमुळेच ते एक प्रबोधक युग निर्माण करु शकले आहेत.
नुकताच मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा झाला. यानिमित्त वाचन संस्कृतीबद्दल सर्वत्र उहापोह झाला. चिंता व्यक्त करण्यात आली. आज क्रमिक पाठ्यपुस्तकांखेरीज आणि क्रमिक शिक्षणानंतर इतर पुस्तकांना ममतेने हात लावणारी पिढी कमी झाली असली तरीही वाचणारेही कमी नाहीत, ही देखील वस्तुस्थिती आहे. नाहीतर जगभर सर्व भाषेत दरमहा हजारो पुस्तकांची निर्मिती होत राहिली नसती. नवनवी ग्रंथालये व वाचनालये उभारली गेली नसती. त्यामुळे जागतिक पातळीवर पुस्तकांबद्दल सारा अंधार आहे, अशी परिस्थिती नाही. या पातळीवर एक प्रकाशाचा प्रदेशही आहे. या सर्व पार्श्वभूमीवर २३ एप्रिल हा दिलस जागतिक पुस्तक दिन आणि जागतिक प्रताधिकार दिन (कॉपीराइटस डे) म्हणून साजरा केला जातो. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन आणि मृत्यूदिनही. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी साजर्या होणार्या जागतिक पुस्तक दिनाला अनेक कंगोरे आहेत. आपल्याकडे नाटकाच्या संहितेला साहित्याचा दर्जा दिला जात नाही. असे असताना जागतिक पातळीवर पुस्तक दिनासाठी विल्यम शेक्सपिअर या नाटककाराच्या जन्मदिवसाची निवड केली जावी, हा नाट्यवाडमयाचा सन्मान आहे, ही बाब मराठी साहित्य क्षेत्राने लक्षात घेवून नाट्यसंहितेला उपरेपणाने वागवण्याचा अगोचरपणाही यापुढे करु नये. मराठी साहित्य अधिकाधिक विश्वात्मक बनण्याच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.
मुळात साहित्याकडे जागतिक दृष्टीनेच पाहिले पाहिजे. कोशात आत्मसंतुष्ट होवून डबक्याला समुद्र समजण्याचे दिवस आता संपले आहेत. आता समुद्र, नव्हे सारे जग कवेत घेण्याचे दिवस आहेत. जग हे एक ग्लोबल व्हिलेज बनले आहे. त्यामुळे पुस्तकांनी सारे प्रवाह आपल्यात सामावून घेतले आहेत. अशा परिस्थितीत जगातील सर्व समाजघटकांनी अधिकाधिक लिहिते झाले पाहिजे. आपल्या जाणीवांचे प्रगटीकरण केले तर त्यातून साहित्याचे नवे कोंभ फुटणे साहजिकच आहे. हे खरे आहे की साहित्याला आता स्वकेंद्रीत बनवून चालणार नाही, त्याला विश्वात्मक अधिष्ठान द्यावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या जाणीवा आणि जागतिक पातळीवरच्या नेणीवा यांचा हुंकार साहित्यातून उठला पाहिजे. असे झाले तर कुठलेही पुस्तक, कुठल्याही भाषेतील पुस्तक जागतिक मिरासदारी संपादन करु शकेल.
पुस्तकांचे स्वत:चे असे जग आहे. या जगात विविधभाषी पुस्तके आहेत. या पुस्तकांत कधी द्वंद्व होत नाही, तर विचारांचीच देवाणघेवाण होते. पुस्तके दिशाभूल करीत नाहीत तर दिशादर्शक ठरतात. असे असले तरी राजहंसाप्रमाणे पाण्यातून दूध टिपून पिण्याची कला वाचकांनी आत्मसात करुन आपला व्यक्तिमत्व विकास साधलाच पाहिजे. चांगले विचार, समाजप्रबोधक आचार आपल्या मनात रुजवण्याची जबाबदारी वाचकांचीही आहे. माणूस म्हणून ही जबाबदारी पार पाडली तर माणुसकीची महाद्वारेही फटाफट उघडली जातील.
अर्थात पुस्तकांना एका साचात कधीही बसवता येणार नाहीत. पुस्तके विविध प्रकारची आहेत. पाठ्यपुस्तके, कथा-कादंबरी, कविता, ज्ञान-विज्ञान, मनोरंजन, क्रीडा, वैद्यक, पाककला अशा जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून उरणारी पुस्तके आहेत. प्रत्येक पुस्तक म्हणजे स्वतंत्र जग असते आणि त्यातूनच जीवनदृष्टी मिळत असते. त्यातून मिळणार्या जगण्याच्या प्रेरणा या सर्वश्रेष्ठ असतात. त्यामुळे पुस्तकांचे हे स्वतंत्र अनुभवविश्व तरणारे आणि तारणारे आहे, असे म्हणावेसे वाटते.
गेल्या काही वर्षांपासून वाचकसंख्या रोडावल्यामुळे तसेच ई-माध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे पुस्तकांच्या अस्तित्वाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. अर्थात अशा शंका घेण्याची गरज नाही. पुस्तके अस्तित्वहिन होणार नाहीत, त्यात बदल होतील आणि तसे बदल होतही आहेत. शेवटी होणारे हे बदल स्वीकारावेच लागणार आहेत. पुस्तकांचे स्वरुप बदलेल, पुस्तकांचे माध्यम बदलेल, पुस्तकाची संकल्पना कायम राहणार आहे, त्यामुळे पुस्तकांच्या अस्तित्वाबद्दल शंका घेवून कोणी आत्मक्लेष करुन घेण्याची गरज नाही. लिहिण्याच्या आणि ज्यावर लिहिले जाते अशा माध्यमांत प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत वेगवेगळे बदल होत गेले आहेत. धूळलेखन, पर्णलेखन, शीलालेखन, ताम्रलेखन, कागदलेखन, त्यानंतर शीला मुद्रण, टंक मुद्रण, ऑफसेट मुद्रण, डेक्सटॉप मुद्रण असे बदल होत गेले आणि त्यातून पुस्तकाची रचना झाली झाली आहे. पुस्तकाची निर्मिती हा समृद्ध बदल म्हणायला हवा.
कागदी पुस्तकांची निर्मिती ही गेल्या दोन शतकांतील आहे. परंतु विसाव्या शतकाच्या अखेरीस संगणकीय युग सुरु झाले आणि मुद्रणाचे सारे संदर्भच बदलले. आता तर २१ वे शतक सुरु आहे. या शतकात पुस्तकांचे माध्यमही वेगाने बदलणार आहे. हा बदल वाचकांना स्वीकारावाच लागणार आहे. बदल होतच असतात, त्यांना रोखू म्हटले तर रोखता येत नाही. बदल हा जगाचा स्थायीभाव आहे आणि आतातर पुस्तकांनाही हे परिमाण लागू पडणार आहे. त्याची सुरुवात झाली ती २००० साली. स्टीफन किंग्जचं रायडिंग द बुलेट हे ई-बुक स्वरुपातलं पहिलं पुस्तक ई-बुक क्रांतीची नांदी ठरली. आतापर्यंत हजारो ई-बुक्सची निर्मिती झाली आहे. साध्या वहीच्या आकाराच्या आयपॅडमध्ये एका ग्रंथालयाचा संपूर्ण ग्रंथसंभार सामावू शकतो. हा ग्रंथसंभार हवा तिथे वाहून नेता येवू शकतो आणि कुठल्याही शांत कोपर्यात बसून छापील पुस्तकाप्रमाणेच आयपॅडवर हवं ते ई-बुक उघडून वाचता येऊ शकतं. अर्थात ही सुरुवात असल्यामुळे त्यात अनेक त्रुटी आहेत, भविष्यात त्या दूर होतील आणि तोपर्यंत ई-बुक सादर करणार्या माध्यमांचाही तितकाच प्रसार झालेला असेल. प्रिंट मिडियाला पर्याय नाही असे म्हटले जात असले तरी तेथेही हे सारे बदल स्वीकारवेच लागणार आहेत. हे बदल ५-२५ वर्षांत झाले नाही तरी पुढील शतकात अपरिहार्य आहेत. उद्याची चिंता आज नको असे म्हटले तरी ई-पेपर आणि ई-बुक त्याची सुरुवात आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अर्थात एवढ्या वर्षांचा जो छापील ग्रंथव्यवहार आहे, तो सर्वप्रथम ई-बुकच्या स्वरुपात आणावा लागेल. तो आणताना सरसकट सर्वच पुस्तके ई-बुकच्या स्वरुपात आणली जाणार नाहीत. ज्या लेखकांना मागणी आहे, तीच पुस्तके ई-बुकच्या स्वरुपात आणली जातील. नवीन लेखकांची पुस्तके मात्र ई-बुकच्या स्वरुपातच येतील, कारण त्याला दुसरा पर्याय असणार नाही. कॉपीराटचे जे प्रश्न उद्भवतील, त्यावर तोडगा काढण्याबाबतचे विचार सुरु झाले असतील, यात वाद नाही. या ई-बुकमुळे पुस्तकांचे जग एका आयपॅडमध्ये सामावले जाणार आहे. प्रत्यक्षातील ग्रंथालये ग्रंथसंग्रहालये ठरणार आहेत. अर्थात छापील कागदी पुस्तकांची ही प्रतिके एके काळी कागदावर पुस्तके छापली जात याचे स्मरण देणारी ठरणार आहेत. आजच्या पिढीला ढबू पैसा माहीत नाही, पण पुढील काही शतकांनी या ग्रंथालयांच्या जागी मॉल उभे राहिले नाही, तर कागदी पुस्तके म्हणजे काय होती हे तेव्हाच्या पिढीला पाहायला मिळेल. काहीही असो पुस्तकांचे जग कधीही विस्मरणात जाणार नाही. हे जग कोणत्या ना कोणत्या प्रकारे सळसळते राहणार आहे. मग ते माध्यम कागदी असो वा आयपॅडचे, त्यातून जगाचे पुस्तकही वाचायला मिळणार आहे. एकंदरीत पुस्तकांचे जग सदैव समृद्ध असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा