-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
गुढ रहस्यांनी भरलेले ऍमेझॉनचे वर्षावन नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या जगाला ग्रासले आहे. या जंगलात लागलेली भीषण आग हे यामागचे कारण आहे. भारतानेही या निमित्ताने आपल्या वनसंपत्तीबाबत चिंतन करणे गरजेचे आहे. गेली काही वर्ष भारतात वनाखालील जमिनींची वाढ होतेय असं सर्वेक्षण अहवालांवरुन दिसून येतंय. खरं तर सामान्य निरीक्षण शक्ती असलेल्या माणसालाही हे जाणवतंय की आपल्या आसपासचा हरितपसारा दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होतोय. याचा परिणाम म्हणून हवामान बदलात मोठा ङ्गरकही जाणवतोय. सगळी प्रसार माध्यमं या विरुद्ध रोज बातम्या प्रसृत करताहेत. त्यामुळे वनाखालील जमिनींची वाढ होतेय या दिशाभूल करणार्या अहवालाच्या भ्रमजाळात अडकण्यापेक्षा वास्तवाला भिडले पाहिजे.
पृथ्वीवरील अनेक प्रांतांमध्ये घनदाट अरण्ये आहेत. काही अतिशय सुंदर, निरनिरळ्या प्रकारच्या चित्रविचित्र वनस्पतींचा खजिना असलेली, तर काही जंगली श्वापदांच्या मुळे कोणालाही पाऊल घालता येणार नाहीत अशी. पण पृथ्वीवर एक जंगल असे ही आहे, जे अतिशय निबिड, भयावह आहे. ते अरण्य आहे ऍमेझॉन वर्षावन. नऊ देशांच्या सीमांपर्यंत या अरण्याचा विस्तार असून हे जंगल सुमारे ५५ मिलियन वर्षे जुने आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या एकूण जीवजंतूंपैकी सुमारे दहा टक्के जीव जंतू या अरण्यात सापडतात. तसेच दोनशेहून अधिक जातींचे पक्षी या अरण्यात आहेत. हे जंगल द. अमेरिका खंडात येते. या जंगलाचा सर्वाधिक म्हणजे ६० टक्के भाग ब्राझीलमधे येतो. त्यामुळे हे जंगल ब्राझीलचं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पेरू, कोलंबिया, व्हेनेज्युएला, इक्वेडोअर, बोलिविया सुरूनेम यांसारख्या देशांत हे वर्षावन पसरले आहे. हे ऍमेझॉन वर्षावन सर्वाधिक कार्बन शोषून ग्लोबल वोर्मिंगचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. परंतु सध्या हे वर्षावन आगीमुळे धुमसत आहे. ही आग विझविण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय, ही आग केव्हा विझेल तर लवकरच दिसेल मात्र या घटनेने सर्व जगाने आपल्या बुडाखाली काय जळते आहे, हेही तपासण्याची गरज आहे.
ऍमेझॉनच्या जंगलात वरचेवर वणवे भडकत असतात. मात्र आता लागलेल्या वणव्यांचे स्वरूप गेल्या दशकभरातील वणव्यांच्या तुलनेत खूपच मोठे आहे. दरवर्षी लाखो टन कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे हे जंगल जागतिक तापमानवाढीचे नियंत्रण करण्यास हातभार लावते. बेसुमार वृक्षतोड आणि खाणी यामुळे या जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याकडे पर्यावरणवाद्यांनी वरचेवर लक्ष वेधले. ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो हे पदावर आल्यापासून या प्रकारात वाढ झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावावर या वर्षावनाची कत्तल चालली आहे, तेथे वणवे लावले जात आहेत असेही पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. या वर्षावनाचा जगाच्या पर्यावरणाशी संबंध असल्यामुळे ब्राझीलच्या अध्यक्षांवर टीकेची झोड उठणे साहजिकच आहे, पण विकासाच्या नावावर सर्वच देश आपल्या येथील जंगल संपत्तीला संपवत आहे, त्याचे काय? त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही काय? केवळ ऍमेझान वर्षावन जळत असताना जगाच्या डोळ्यातून अश्रू येवून चालणार नाही, तर आपापल्या देशात जी पर्यावरणाची हानी चालली आहे, त्याने डोळे उघडण्याची गरज आहे.
ऍमेझॉन वर्षावन जळणे हे जगासाठी धक्कादायक आहे, पण जगातील प्रत्येक देशात याबाबत धोकादायकच परिस्थिती आहे. खरेतर शंभर विशाल वृक्ष दरवर्षी ५३ टन कार्बन डायऑक्साइड आणि २०० किलो अन्य प्रदूषके शोषून घेतात, तसेच ५ लाख ३० हजार लिटर पावसाचे पाणी अडवून धरण्यासाठी मदत करतात. घराच्या परिसरात सुयोग्य पद्धतीने वृक्ष लागवड केल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत वातानुकूलन यंत्राचा वापर कमी होऊन विजेचा खर्च ५६ टक्क्यांनी कमी करता येतो. याखेरीज थंडीच्या दिवसांत हेच वृक्ष गार हवा रोखून आपले घर उबदार ठेवतात. कोणत्याही वृक्षाच्या वजनात एक ग्रॅम वाढ झाली, तरी २.६६ ग्रॅम अतिरिक्त ऑक्सिजन मिळतो. एखाद्या विशाल वृक्षापासून मिळणारा ऑक्सिजन, ङ्गळे, लाकूडङ्गाटा आणि बायोमास यांची पैशांच्या रूपात किंमत केल्यास ५० वर्षांच्या अवधीत हे वृक्ष आपल्याला सुमारे दोन लाख डॉलरचा ङ्गायदा देतात. पण विकासाची गणितं वेगळी असल्यामुळे याबाबतचे चित्रही जगभर वेगळेच आहे. भारतही याला अपवाद नाही.
भारतातील घनदाट जंगलांचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. भारताचे एकूण वनक्षेत्र ७ लाख ८ हजार २७३ चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के आहे. वृक्ष आणि वनक्षेत्र मिळून ८ लाख २,०८८ चौरस किलोमीटर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.३९ टक्के आहे. १९९९ मध्ये घनदाट जंगलांचे क्षेत्र ११.४८ टक्के होते, तर २०१८ पर्यंत ते अवघे २.६१ टक्के उरले आहे. उत्तराखंड, मिझोराम, तेलंगणा, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि दादरा नगर हवेली आदी राज्यांमध्ये वनक्षेत्र झपाट्याने घटले आहे. सघन वनक्षेत्र कमी होण्याच्या प्रक्रियेमुळे वन्यजीव शहरी भागातही दिसू लागले आहेत. खेड्यांमध्ये तर त्यांचा वावर सातत्याने वाढत असून, त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रमाण वाढत आहे.
‘नेचर’ या नियतकालिकातील एका अहवालानुसार, भारतात सद्यस्थितीत सुमारे ३५ अब्ज वृक्ष आहेत. या संख्येला लोकसंख्येने भागले असता प्रतिव्यक्ती २८ वृक्ष आपल्याकडे आहेत. हा आकडा ऐकायला, पाहायला सुखद वाटत असला, तरी तो खूपच लहान आहे, हे समजून घेतले पाहिजे. मुख्य म्हणजे, यातील बहुतांश झाडे ही शहरे आणि गावांमध्ये नसून, आपल्यापासून दूर घनदाट जंगलात आहेत. वणवे लागत असल्याने आणि लावले जात असल्याने, तसेच वृक्षांची अंधाधुंद कत्तल होत असल्यामुळे घनदाट जंगलांचे हे क्षेत्रही सातत्याने आणि वेगाने संकोचत चालले आहे. भारताच्या बाबतीत धोका अधिक गंभीर होण्याचे कारण असे की, एकीकडे वृक्षतोडीचा वेग प्रचंड असताना दुसरीकडे वृक्ष लागवडीच्या आणि संवर्धनाच्या बाबतीत कमालीची उदासीनता दिसून येते. ज्या मोहिमा आहेत, त्यात गांभीर्य पहायला मिळत नाही. या सर्वांचा दुष्परिणाम पर्यावरणावर होतो आहे, त्यामुळेच गेल्या काही वर्षांत अनियमित पाऊस, अतिवृष्टी, अनावृष्टी, महापूर, डोंगर खचणे आदी प्रकारात वाढ झाली आहे. पुढची पिढी कदाचित यामुळे ऑक्सीजनपासून वंचित होईल. हा जीवनासमोरचा प्रश्नचिन्ह असेल. त्यामुळे आजच सावध होण्याची गरज आहे. ऍमेझॉन वर्षावन जळतेय, ते तोडलेही जात आहे, त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागतीलच, परंतु आपापल्या देशांतील जंगलाच्या दूरवस्थेकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. ऍमेझॉन वर्षावन जगाचे ङ्गुफ्ङ्गुस असले तरी भारतासह जगभरच्या देशांतील, राज्यांतील जंगले ही तेथील ङ्गुफ्ङ्गुसे आहेत, ती नष्ट झाली तर मानव संस्कतीच लयाला जाईल. मानव संस्कती टिकवायची असेल तर अरण्य संस्कृती टिकवावी लागेल आणि ते माणसाच्याच हातात आहे. तेव्हा सावधान!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा