-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
महाराष्ट्राचे स्वच्छतादूत, थोर निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, जगभर दिवाळीसारखा उत्साह श्रीभक्तांमध्ये संचारला आहे. रायगड जिल्ह्यात तर या उत्साहाला सीमा नाही, कारण रायगड जिल्ह्याला हा सातवा पद्म पुरस्कार लाभला आहे. तर दोन भारतरत्न पुरस्कारांचाही हा जिल्हा मानकरी ठरला होता. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रुपाने जिल्ह्याला पुन्हा पद्मपुरस्काराने सन्मान लाभत आहे, ही विशेष बाब ठरते.
 |
आचार्य बिनोबा भावे |
रायगड जिल्हा हा संत, समाजसुधारक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांमुळे ओळखला जातो. या दिग्गजांमुळे जिल्ह्याचे नाव देशात आणि जगात चमकते राहिले आहे. त्यात साध्यासोप्या भाषेत दासबोध ग्रंथाचे निरूपण करून आपले लाखो अनुयायी निर्माण करणारे रेवदंड्याचे ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव आदराने घेतले जाते. नानासाहेबांनी त्यांच्या निरूपणातून लाखो भाविकांना अध्यात्माची गोडी लावली. त्यांच्या निधनानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. समाजातील जातीभेद गाडून सगळ्यांना बरोबर घेऊन समाजसुधारणेचे, समाजातील सर्व स्तरातील जनतेला सोबत घेऊन जाण्याचे काम आप्पासाहेब करीत आहेत.
 |
पांडुरंगशास्त्री आठवले |
समाजातील हुंडाबंदी, जातीयता आदीना दूर सारून महिलांसाठी समानतेचा हक्काचा पुरस्कार नानासाहेब व आप्पासाहेबानी केला. समाजसुधारणेचे, प्रबोधनाचे मोठे काम या कुटुंबाकडून होत आहे. एक सशक्त मनाचा आणि चांगल्या विचारांचा समाज निर्माण करण्याचे काम आप्पासाहेब करीत आहेत. त्यांचे कार्य महान असून रायगड भूषण, शिवसमर्थ पुरस्कार, जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार आदी पुरस्कारानी त्याना गौरवण्यात आलेले आहे. संत पुरस्काराने मोठे होत नसतात, ते आपल्या कार्याने मोठे असतात, त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी पद्मभूषण पुरस्काराकडे त्याच भावनेने पहात आहेत. केंद्र सरकारने आपणाला जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार हा नानासाहेबांच्या विचारांचा गौरव आहे, ही त्यांची प्रतिक्रिया त्याच तठस्थ भावनेचे प्रतिक आहे, असे म्हटले तर त्यात काही चुकीचे नाही.
 |
सी.डी. देशमुख |
विशेष म्हणजे डॉ. आप्पासाहेबाच्या रुपाने अलिबाग तालुक्याला हा तिसरा पद्मश्री पुरस्कार आहे. पहिला पद्मश्री पुरस्कार सासवणे येथील जागतिक कीर्तीचे शिल्पकार नानासाहेब करमरकर यांना १९६४ साली मिळाला होता. त्यानंतर अलिबागच्या प्रा. रमेश तेंडुलकर याचे पुत्र क्रिकेटमधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांना १९९९ साली पद्मश्री पुरस्कार, २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर २०१४ साली त्यांचा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानेही सन्मान झाला होता. सचिन तेंडुलकर यांचा अलिबागला रहिवास नसला तरी सचिन तेंडुलकर अलिबागला कधी परके नसल्यामुळे हा पुरस्कार अलिबागकरांसाठी जवळचा होता. त्यानंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना
पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे म्हणजे ‘सोनेपे सुहागा’च म्हटले पाहिजे. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर
 |
नानासाहेब करमरकर |
रोह्याचे सुपुत्र, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख यांचा १९७५ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान झाला आहे. रोह्याचेच सुपुत्र, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचा १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान झाला आहे. पेण तालुक्यातील गागोद्याचे सुपुत्र, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा १९८३ साली मरणोत्तर सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कामगार चळवळीतील कवी नारायण सुर्वे अखेरीस कर्जतला वास्तव्यास होते, त्यांचाही १९९८ साली पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला होता.
देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांचा यादीत रायगड जिल्ह्यातील तीन तालुके ठळकपणे समोर येतात. अलिबाग तालुक्याला एक भारतरत्न, एक पद्मविभूषण,
 |
नारायण सुर्वे |
तीन पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने अलिबाग
तालुक्याचे यश लख्ख दिसून येते. पेण तालुक्यालाही एक भारतरत्न पुरस्कार
 |
सचिन तेंडुलकर |
मिळाल्याने हा तालुकाही अव्वल ठरला आहे. रोहे तालुक्याला दोन पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने रोह्याचा वेगळाच दबदबा देशात आहे. कर्जतला एक पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने कर्जतही मान उंचावली आहे. अशा प्रकारे देशात सातत्याने रायगड जिल्ह्याचा सन्मान होत राहिला आहे, ही या जिल्ह्यातील प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा