-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
‘मिशन शक्ती’ अंतर्गत भारताने २७ मार्च रोजी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताच्या शास्त्रज्ञांनी ‘मिशन शक्ती’ ऑपरेशन यशस्वी करत लो अर्थ ऑरबिट या उपग्रहाला ए सॅट (अँटी सॅटेलाईट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट केले. या मिशनमुळे अमेरिका, रशिया, चीन प्रमाणेच भारत अंतराळ महाशक्ती बनला आहे. त्यामुळे या देशांना पोटदुखी झाली आहे त्यामुळे ही चाचणी कशी चुकीची होती, हे भासवण्याचा आपले ‘शेजारी’ चीन व पाकिस्तान प्रयत्न करताहेत. अमेरिकेनेही त्याबाबतची मळमळ व्यक्त केलीच. निमित्त केले अंतराळ कचर्याचे. पण यालाही भारतीय शास्त्रज्ञांनी चोख उत्तर देऊन अमेरिकेचा कचराच केला.
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या दोन संस्थांनी ‘ए-सॅट’ हे कृत्रिम उपग्रहभेदी क्षेपणास्त्र विकसित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘मिशन शक्ती’ मोहिमेवर काम सुरू होते. ओडिशातील बालासोर येथील ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून २७ मार्च रोजी सकाळी ११-१६ वाजता ‘ए-सॅट’ प्रक्षेपित करण्यात आले आणि सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत टिपला आणि भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला. भारत आता ३०० किमीहून २ हजार किमी उंचीवरील कोणत्याही सक्रिय उपग्रहाला पाडू शकतो. चाचणीसाठी वापरलेला ‘एलईओ’ (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह भारताचाच निकामी झालेला उपग्रह होता. या चाचणीने भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र क्षमता सिद्ध झाल्यामुळे देशावर अवकाशातून ‘वक्रदृष्टी’ ठेवण्याची हिंमत यापुढे कोणी करणार नाही.
२०३० पर्यंत अंतराळात सुसज्ज असे लष्कर सज्ज करण्याचे मोहिम अमेरिकेने हाती घेतली आहे. तर, अंतराळातील उपग्रहांमध्येच अणुबॉम्ब किंवा अन्य शस्त्रास्त्र ठेवता येतील का? जेणेकरून तेथूनच शत्रूवर हल्ला चढविता येईल, अशा प्रकारची तयारी रशिया आणि चीन यांच्याकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून अण्वस्त्रांप्रमाणेच अमेरिकेने सर्वात प्रथम उपग्रहाचा लक्ष्यभेद करणारे अस्त्र निर्मितीचे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान (ए-सॅट) सर्वप्रथम विकसित केले. अमेरिकेने १९५९ साली, रशियाने (तत्कालीन सोव्हिएत संघ) १९६० साली तर चीनने २००७ साली तर उपग्रह पाडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पाडली होती. चीनचा हेतू अंतराळातील भारताच्या उपग्रहांवर धाक ठेवण्याचा होता. कारण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युद्ध प्रत्यक्ष जमिनीवर लढले जात असले तरी त्यात उपग्रहांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. कारण, लढाऊ विमाने, रडार, सीमारेषेवरील पोस्ट, मुख्यालय ही सारीच यंत्रणा उपग्रहाच्या माध्यमातूनच एकमेकाच्या संपर्कात राहते. तसेच संदेशवहन, हवामान, दळणवळण या सर्वांसाठी आवश्यक गोष्टी आणि गरजा ही उपग्रह भागवत असतात. त्यामुळे उपग्रहांची सुरक्षा राहिली तर जमिनीवरील युद्धही जिंकणे शक्य असते. अशा परिस्थितीत तुमची उपग्रह नष्ट करण्याची आमची क्षमता आहे, असा धाक कोणी दाखवत राहिले, तर ते गंभीर असते. हे उपग्रह नष्ट केले तर कोणाही देशाची आंधळ्यासारखी अवस्था होऊ शकते. भारताला आपली अवस्था अशी होऊ द्यायची नव्हती, त्याला आपल्या उपग्रहांची सुरक्षा महत्वाची होती आणि आहे म्हणूनच भारतानेही आपल्या उपग्रहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतरांना, मुख्यत्वे चीनच्या ए सॅट क्षमतेला उत्तर म्हणून आपल्या ए सॅटची चाचणी केली. या यशस्वी चाचणीमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. भारताचा धाक आता चीनला असणार आहे. गोष्टी बदलतात त्या अशा.
भारताने चाचणीसाठी आपला ‘एलईओ’ (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह ए-सॅट उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने नष्ट केले. लो अर्थ ऑर्बिट ही एक अंतराळविज्ञानातली संज्ञा आहे. ऑर्बिट या शब्दाचा अर्थ होतो कक्षा. पृथ्वीपासून ते अवकाशापर्यंतच्या अंतराचे विविध टप्पे असतात. त्या टप्प्यांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार संज्ञा दिली जाते. लो अर्थ ऑर्बिट ही त्यातीलच एक संज्ञा आहे. ही कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळची कक्षा म्हणून ओळखली जाते. ही कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते अवकाशात १६० किलोमीटर ते २००० किलोमीटरपर्यंत पसरलेली असते. या अंतराळ परिक्षेत्राचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असल्यामुळे इथे कनेक्शन सगळ्यात चांगलं मिळतं. त्यामुळे बहुतांश उपग्रह याच ठिकाणी असतात. या कक्षेत असलेल्या उपग्रहांना पृथ्वीवरच्या हालचाली सुस्पष्टपणे टिपता येतात. म्हणूनच या कक्षेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. लो ऑर्बिट व्यतिरिक्त मीडियन अर्थ ऑर्बिट, जियोसिन्क्रोनस ऑर्बिट आणि त्यानंतर असलेली हाय अर्थ ऑर्बिट असे या कक्षांचे प्रकार आहत. हाय अर्थ ऑर्बिट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३५,७८६ किलोमीटरवर आहे.
भारताने ए सॅट (अँटी सॅटेलाईट) उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी ‘एलईओ’ (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह पाडून घेणे अंतराळ संरक्षण सिद्धतेचे पहिले पाऊल आहे. यामुळे चीनची साथ असणार्या पाकिस्तानलाही धाक बसणार आहे. चीनने भारतावर धाक रहावा म्हणून पाकिस्तानला अणुबॉम्बसारखे विध्वंसक शस्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. पाकिस्तानमधून सूत्र हलविणार्या दहशतवादी संघटनांना आंतरराष्ट्रीय कारवाईपासून वाचविण्यासाठी चीन अजूनही त्यांची ढाल बनला आहे. पाकिस्तान परंपरागत सैन्य क्षमतेच्या बाबतीत भारतासमोर टिकाव धरु शकत नाही. हा न्यूनगंड तो वारंवार अण्वस्त्रांची धमकी देऊन व्यक्त करत आला आहे. भारताविरुद्ध अणवस्त्रांचा प्रथम वापर करण्यासा आपण मागेपुढे पहाणार नाही असा त्यांचा अणुसिद्धांत आहे. त्याआडून तो जिहादी दहशतवादी तयार करुन भारताच्या विरुद्ध छुपे युद्ध करत आहे. आता भारत आपल्याकडे येणार्या क्षेपणास्त्रांना पूर्ण क्षमतेने नष्ट करु शकतो आणि यामुळे पाकिस्तानच्या हेकडीतील हवा बाहेर निघाली आहे.
भारताचा स्वसुरक्षेच्या आपल्या उपग्रहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ए सॅट (अँटी सॅटेलाईट) उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीचे योग्य पाऊल उचलले, त्यात नेत्रदीपक यशही मिळाले, पण हे यशाबरोबरच अंतराळ कचर्याचा प्रश्न उपस्थित झाला. भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झालाय. भारताने पाडलेल्या उपग्रहाचे सुमारे ६० तुकडे आतापर्यंत सापडले आहेत. त्यापैकी २४ तुकडे आयएसएसच्या कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या बिदूच्या बाहेर सापडले आहेत. अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असा शेरा नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन यांनी मारला. त्यामुळे भारताचं खरंच चुकलंय का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, इस्रोनं लगेचच त्याचं निरसन केलं आहे. देशाची मान खाली जाईल असं कुठलंही काम आपण केलं नसल्याचंही इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी स्पष्ट केलं. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. तेथे निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल. चीनने ८०० किलोमीटर उंचीवर ए सॅट क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. तिथे हवेचा दाब जवळपास नसतोच. त्यामुळे या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा, पाडलेल्या उपग्रहाचे ३००० तुकडे अजूनही अंतराळात तरंगत आहेत. तसा प्रकार होऊ नये यादृष्टीने भारताने पूर्ण काळजी घेतल्याचं तपन मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारताविरुद्ध बोंब मारणार्यांचा कचराच झाला असे म्हटले तर त्यात वावगे नाही.
१९५७ साली रशियाने स्पुटनिक हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला तेव्हापासून अंतराळात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत युरोपीय देश, जपान, चीन आणि भारत यांसह जवळ जवळ १९ देश अवकाशमोहीम राबवत आहेत. त्यामुळे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती ङ्गिरत आहेत. संदेश दळणवळण, हवामान अंदाज आदी क्षेत्रांसाठी उपग्रह आवश्यकच आहेत. अंतराळात सोडण्यात आलेल्या प्रत्येक उपग्रहाचा कालावधी ठरलेला असतो. हे उपग्रह कालान्तराने सौरवात किंवा तापमानातील प्रचंड ङ्गरकांमुळे किंवा नियोजित काम संपल्याने निकामी होतात. ते उपग्रह खाली न पडता अवकाशात ङ्गिरत राहतात. एकामागे एक असे अनेक उपग्रह सोडले जातात आणि कालांतराने ते निरुपयोगी होऊन ङ्गिरत राहतात आणि साठत राहतो अंतराळातील कचरा. उपग्रहांवरील आच्छादने, बॅटर्या, इंधनाच्या छोट्या-मोठ्या टाक्या, नटबोल्ट, रंगाचे पापुद्रे यासारखा ८ ते १० हजार टन इतका कचरा अंतराळात साठलेला आहे. या कचर्यामुळे इतर उपग्रहांना, अवकाश मोहिमांना धोका निर्माण होणे साहजिकच आहे. हा धोका कमी करण्यासाठी आणि अंतराळ सिद्धता राखण्यासाठी भारताने ए सॅट (अँटी सॅटेलाईट) उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यामुळे भारताने पाडलेल्या लो अर्थ ऑर्बिट उपग्रहाचा अतराळात कचरा कायम राहणार नसून त्याचे हवेतच ज्वलन होणार आहे. अंतराळ स्वच्छतेच्या बाबतीत भारत अतिशय जागरुक आहे. भारताला शिकवावे लागत नाही, तो आदर्श घालून देतो.
१९६७ मध्ये संयुक्त राष्ट्राने या मुद्द्यावर आऊटर स्पेस ट्रिटी (अंतराळाच्या बाह्य सुरक्षेसाठी करार) तयार केली होती. त्यानुसार एखाद्या उपग्रहाची हानी होणे किंवा जगातील मोठ्या प्रदेशावर विपरीत परिणाम करू शकणार्या शस्त्राच्या चाचणीवर बंदी आहे. त्यात उपग्रहरोधी क्षेपणास्त्र चाचणी व जमिनीवरून डागण्यात येणार्या लेझरवरील बंदीचा समावेश आहे. या करारात बड्या देशांची दादागिरी असल्यामुळे भारताने ए सॅट क्षमता असणार्या कोणत्याही देशाबरोबर सुरक्षा करार केलेला नाही. चीनने सर्व सुरक्षा करार मोडून चाचणी केली होती, पण थोड्या टिकेनंतर या बड्या देशांनी चीनला पदरात घेतले होते. भारत कोणत्याही बंधनात नसल्याने तो ही चाचणी घेऊ शकला. अणुचाचणीच्या बाबतीतही भारताने असेच पाऊल उचलले होते. भारत जर अमेरिकेसारख्या बड्या देशांना दबून राहिला तर चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारील देश बड्या खोड्या काढायला कमी करणार नाही. असे होऊ नये यासाठी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या दोन संस्थांनी ‘ए सॅट’ हे कृत्रिम उपग्रहभेदी क्षेपणास्त्र विकसित करुन देशाला भक्कम केले, यामुळे जगात भारताचा दबदबा वाढला आहे यात दुमत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा