अलिबागला मिनी गोवा ओळखले जात असलं तरी आमचं अलिबाग हे जगात भारी आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, समृद्ध खाद्य संस्कृतीने परिपूर्ण असा हा परिसर आहे. त्यामुळे येथे एक वेगळे हॉटेल हब निर्माण झाले आहे. गोंधळपाडा-अलिबाग येथील मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बार प्रारंभापासूनच येथील खाद्य संस्कृतीचा महोत्सव भरवत आला आहे. जंबो थाळी या मेजवानीचे वैशिष्ट्य. १८ मार्चच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त १४ मार्चपासून पाच दिवस विविध जंबो थाळ्या खवय्यांसाठी विशेष सवलतीत उपलब्ध केल्या जाणार आहेत. पर्यटक आणि अलिबागकर खवय्यांसाठी ही पर्वणी आहे, असेच या ठिकाणी म्हणावे लागेल.
मेजवानी! मेजवानी म्हटले की पंचपक्वान्नांचा थाट आलाच. पंचपक्वान्न म्हटले की तोंडाला पाणी सुटते. पण खवय्यांच्या या काळात मेजवानीच्या आणि आतिथ्याच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. मेजवानी आता पंचपक्वान्नांचीच नसते तर झणझणीत मटन, चिकन, मासे यांची आणि दिलखुलास आतिथ्याचीही असते. पेण-अलिबाग मुख्य रस्त्यावरील गोंधळपाडा येथील मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बारमध्ये याचा प्रत्यय येतो. म्हणूनच पर्यटक आणि अलिबागकर यांच्या जीभेवर रेंगाळणारा मेजवानीचा स्वाद या गार्डन रेस्टॉरंटची कीर्ती दशदिशांत पसरवित असतो.
मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बारचा शुभारंभ १८ मार्च २०१८ ला झाला. या १८ मार्चला २ वर्षे पूर्ण होऊन मेजवानी तिसर्या वर्षात पदार्पण करीत आहे. या रेस्टॉरंटचे मालक गणेश गावडे, विनायक गावडे, व्यवस्थापकीय संचालक प्रमुख शंकरशेठ ढोणुक्षे, कृष्णाशेठ तुपट यांनी काळाची पावले ओळखून प्रारंभापासूनच वेगवेगळे प्रयोग करुन पर्यटक आणि अलिबागकरांना आपल्याकडे आकर्षित केले. अर्थात हे प्रयोग खवय्यांच्या मानसिकतेला ओळखूनच करण्यात आले. त्यामुळे त्यात कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. मेजवानीत मिळणारा प्रत्येक पदार्थ हा दर्जेदार असतोच, हा विश्वास निर्माण केला आणि त्या विश्वासाला बाधा आणू दिली नाही. या विश्वासामुळेच पर्यटक आणि अलिबागकरांची पावले विविध प्रसंगी मेजवानी रेस्टॉरंटकडे वळत असतात.
मेजवानीमध्ये विविध खाद्य उपक्रम राबविले जातात. त्यांचा थाळी महोत्सव विशेषकरुन खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणारा ठरला आहे. त्यांच्या सर्व थाळ्या या जंबो थाळ्या असतात आणि त्या १९९ रुपयांपासून २४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ज्यांना जे हवे ते आणि तितके, विविध दरांमध्ये उपलब्ध केले जात असल्याने समाधान सोबत घेऊनच पर्यटक मागे फिरतात आणि पुन्हा पुन्हा या गार्डन रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचा स्वाद घ्यायला येतात. येथील चव त्यांना या मेजवानी रेस्टॉरंटचे विस्मरण होऊ देत नाही. गेल्या दोन वर्षाच मेजवानीमध्ये सी फूड फेस्टिव्हल, कबाब फेस्टिव्हल, गावरान जत्रा फेस्टिव्हल, बिर्याणी फेस्टिव्हल, चायनीज फेस्टिव्हल आदी उपक्रम राबविले. या फेस्टिव्हलला पर्यटक अलिबागकर खवय्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या उत्तम प्रतिसादाने बळ मिळाल्याने मेजवानीची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे.
मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बारचा परिसर आल्हाददायक आहे. पार्कींगची उतम सोय आहे. डायनिग हॉल, फॅमिली रुम, गार्डन, बार असे या गार्डन रेस्टॉरंटचे स्वरुप आहे. अलिबागकरांसह राज्या-परराज्यातील, अगदी विदेशातील पर्यटकांनीही या मेजवानीचा आस्वाद घेतला आहे. गार्डनमध्ये वाढदिवस,लग्नाचे वाढदिवस, पत्रकार परिषद, इतर विविध कार्यक्रम होत असतात. खर्याअर्थाने मेजवानीकडून अतिथींची मेजबानी होत असते.
असे हे मेजवानी रेस्टॉरंट तिसर्या वर्षात पदार्पण करीत आहे. दुसर्या वर्धापन दिनानिमित्त १४ मार्च ते १८ मार्चपर्यंत खवय्यांसाठी १० टक्के ते ५० टक्के विशेष सवलत मेजवानी गार्डन रेस्टॉरंटच्या वतीने देण्यात आली आहे. याप्रसंगी चिकन जंबो थाळी, मटन जंबो थाळी, अलिबाग आगरी फेमस थाळी, अलिबाग कोळावाडा थाळी खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या जंबो थाळ्या म्हणजे येथील खाद्य संस्कृतीचे निदर्शक असणार आहेत. झटकेबाज आगरी कोळी पदार्थांची मेजवानी खवय्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. ही पर्वणी अलिबागकरांनी आणि पर्यटकांनी चुकवू नये आणि त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह मेजवानी गार्डन रेस्टॉरंटमध्ये येऊन सवलत काळात विशेष सवलतीचा फायदा घ्यावा, मेजवानीचा स्वाद घ्यावा, तृप्त व्हावे, असे आवाहन मेजवानी गार्डन रेस्टॉरंटच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे मेजवानीचा स्वाद घ्यायला जायलाच हवे, खरे ना?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा